Home बुलडाणा कंटेंटमेंट झोन मधील मजुरांना अर्थ सहाय्य करा –  सय्यद हारून भाई

कंटेंटमेंट झोन मधील मजुरांना अर्थ सहाय्य करा –  सय्यद हारून भाई

302

गरीब मजुरांवर उपासमारीची पाळी

अमीन शाह

मेहकर – शहरात कोरोना महामारीचे संकट वाढले असून शहरात काही भाग हा प्रतिबंधित क्षेत्र ( कंटेंटमेंट झोन ) करण्यात आलेले आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात मोलमजुरी करणाऱ्या अनेक मजुरांना 14 दिवस घरातच रहावे लागत आहे.

यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने शासनाने अशा गरीब कुटुंबांना अर्थसहाय्य करावे अशी मागणी उन्नती अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्था मेहकर च्या वतीने करण्यात आली आहे.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मोलमजुरी करुणं उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना जीवन जगणे कठीण झाल्याने मायबाप शासनाने अशा लोकांना आधार द्यावा असे म्हटले आहे.
या निवेदनावर अध्यक्ष सैय्यद हारून सैय्यद नूर,तौफिक खान सिकंदर खान,उपाध्यक्ष,सै मोईन सै हारून सचिव यांचेसह पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.