Home कृषि व बाजार शेतकंर्याना थेट बांधावर खतांचे वाटप सुरू.!

शेतकंर्याना थेट बांधावर खतांचे वाटप सुरू.!

566

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

देवळी तालुका कृषी विभागाचा उपक्रम

वर्धा – खरीप हंगाम तोंडावर आला असुन शेतकरी खरीप पुर्व पेरणीच्या तयारीला लागले आहेत.मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धोका लक्षात घेऊन खतांच्या दुकानांवर शेतकर्याना गर्दी करण्याची वेळ येऊ नये,यासाठी शतकर्याचे गट तयार करण्यात थेट बांधांवर खत या योजनेची सुरुवात कृषी विभागाने केली आहे.मागिल अडीच महिन्यांपासुन कोरोंना विषाणूच्या प्रसारामुळे सर्वत्र असलेल्या लॉकडाऊनमुळे जणजिवन विस्कळीत झाले आहे.सध्या लॉकडाऊन शीथील करण्यात आल्याने ठप्प झालेले व्यवहार बर्यापौकि सुरु झाले.शेतकर्याना गावाबाहेर न पडता बियाणे खते ऊपलब्ध व्हावेत म्हणून देवळी तालुका कृषी अधिकारीअश्विनी कुंभार यांच्यापुढाकारांतून आत्मा च्या अन्तर्गत जवळपास 80 शेतकरी गटाच्या माध्यमातून तालुक्यातील थेट शेतकर्याच्या बांधांवर खते ,बियाणे ऊपलब्ध करुण देण्यात येत आहे. त्यामूळे शेतकर्याना खते-बियाणे घेण्यासाठी बाजारात गर्दीच्या ठिकाणी येन्याची गरज पडत नसल्याने शेतकर्यातून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.या योजनेचा शुभारंभ तालुक कृषी अधिकारी अश्विनी कुभार मंडल अधिकारीअतुल वायसे कृषी पर्यवेक्षक सुभाष राठोड कृषी व्यावसायिक रणजित देशमुख तसेच गटातील सदस्य,अध्यक्ष,सचिव, यांच्या उपस्थित तालुक्यातील दिघी पळसगाव येथून करण्यात आला.कोरोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन खतांच्या दुकानांवर शेतकर्याना गर्दी करण्याची वेळ येऊ नये, यासाठी शेतकर्याचे तालुक्यात गट तयार करण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून शेतकर्याना थेट बांधांवर खतांचे व बियानाचे वाटप करण्यात येत आहे. सध्या युरियाचा तूटवडा होत असला तरी लवकरच युरियाही उपलब्ध होणार आहे.त्यामूळे सर्व शेतकर्यानी आपापल्या गावात गट स्थापन करुण अशा पध्दतीने खते व बियाणे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अश्विनी कुंभार यांनी दिली.