May 29, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

महाड वाहतूक पोलीस कडून लाखो रुपयांचा दंड वसूल…!

महाड – जुनेद तांबोळी

रायगड – मा. पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सौ एस डी पो महाड रायगड जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे व महाड शहर पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली एअसाय सांळुखे , गुजर , पोलीस सागर गायकवाड , पोलीस प्रदीप घोडके , पोलीस पवार , पोलीस निळेकर , पोलीस कोंडाळकर हे महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक नातेखिंड दसतुरीनाका नाका शिरगाव या ठिकाणी नाकेबंदी करत 22 मार्च ते 17 मे पर्यंत वाहतूक पोलिसांनी महाड शहर हद्दीत राबविलेल्या बेशिस्त वाहतूक दारा विरोधात कारवाई करत जवळपास 3550 केसेस करत 7 लाख 76 हजार 600 रुपयांचा विक्रमी महसूल गोळा केला आहे व कोरोनाबाबत जनजागृती करताना एअसाय सांळुखे बोलताना म्हणाले तुम्ही विनाकारण रस्त्यावर फिरु नका व अत्यावशक असेल तरच घराबाहेर पडा आणि वाहनचालकाने जर का वाहतुकीचे नियम मोडले तर आम्ही कारावाई करणारच आणि सॅनेटाईझर ने हात स्वछ धुणे व मास्क नेहमी घालायला विसरु नका घरीच रहा सुरक्षित रहा आणि प्रशासनाला सहकार्य करा असे आव्हान महाडकर नागरिकांना करण्यात आले.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!