Home मराठवाडा एका पॉझिटीव्ह ने टेंभुर्णीकरांची झोप उडाली…!

एका पॉझिटीव्ह ने टेंभुर्णीकरांची झोप उडाली…!

14
0

तहसीलदार सतीश सोनी यांनी दिला टेंभुर्णी तीन दिवस बंदचा आदेश.

लक्ष्मण बिलोरे

जालना – टेंभुर्णी ला 13 तारखेला मुंबई हून आलेल्या महिलांचा रिपोर्ट नुकताच पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली असून त्या महिलांच्या संपर्कात आलेल्या चार जणांचा शोध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी तीन दिवस बंद ठेवण्याचा आदेश उपविभागिय अधिकारी भोकरदन , शिवकुमार स्वामी यांनी दिला आहे. सदरील महिला पॉझिटिव्ह आल्याने टेंभुर्णी करांची अक्षरशः झोप उडाली आहे . नागरिकांनी घाबरून जाऊ नये, दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कात जे जे आले त्यांचे तपास आणि व त्यांचे अहवाल तपासने सुरु असून अजुन कोण कोण संपर्कात असल्याने त्यांना ही आता कोरांटाइन करण्याची गड़बड़ सुरु झाली असून पुढील धोका कसा कमी करता येईल या बाबत येथील पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन , आरोग्य अधिकारी डॉ . प्रकाश साबळे, डॉ. अमोल वाघ, डॉ. एस बी जायभाये, उप निरीक्षक साखळे , ग्रामसेवक सुखदेव शेळके वैदकीय तालूका अधिकारी सोनटक्के ,सरपंच गणेश धनवई, पत्रकार रावसाहेब अंभोरे विनोद कळंबे ,अलकेश सोमानी, विष्णु मगर ,डॉ .पंडित सुरुषे ,धोंडीराम कउटकर ,आशा महिला आदी उपस्तिथ होते .
टेंभुर्णीत कोरोना बाबत 94 जन कोरंटाइन केलेले असून या महिलाला येथे ठेवण्यात आले होते. तिच्या संपर्कात जाफ्राबाद येथील नातेवाइक आल्याने टेंभुर्णी सह तालुक्या ची ही चिंता वाढली आहे.