Home महत्वाची बातमी चार धारदार तलवारी, रामपुरी चाकूसह अवैध शस्रसाठा जप्त, बीड स्थानिक गुन्हे शाखेची...

चार धारदार तलवारी, रामपुरी चाकूसह अवैध शस्रसाठा जप्त, बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

33
0

बीड, /अँड शेख ताज अहेमद अन्सारी

चार धारदार तलवारी, २ धारदार सुरे, रामपुरी चाकू व छ-याची गण असा एकूण १४ हजार २०० रुपयांचा अवैध शस्त्रसाठा जप्त करून बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई आज केली.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक २२ मे रोजी रोजी गुप्त खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की पालवन चौक, मस्के वस्ती, बीड येथे राहणारा करण भीमसिंग टाक याने तो राहत असलेल्या राजू महासिंग टाक याचे राहत्या घरी अवैध शस्त्रसाठा केला आहे. या खात्रीलायक माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी जावून छापा मारला. राजू टाक याच्या घरझडतीमध्ये करण भीमसिंग टाक (रा.बलभीमनगर, पेठ बीड. ह.मु.पालवन चौक, मस्के वस्ती) याने त्याचा चुलता राजू महासिंग टाक (रा.पालवन चौक, मस्के वस्ती) याचे राहते घरात ४ धारदार तलवारी, २ धारदार सुरे, रामपुरी चाकू व छ-याची गण असा १४ हजार २०० रुपयांचा अवैध शस्त्रसाठा जप्त केला. याप्रकरणी पो.स्टे.बीड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपीस ताब्यात घेतले आहे. सदरचा अवैध शस्त्रसाठा कशासाठी केला होता व शस्त्रे कोठून आणली याबाबत तपास चालू आहे. राजू टाक याचेवर यापूर्वी १६ विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

Unlimited Reseller Hosting