
विविध सामाजिक संघटनानी एकत्र येऊन लॉक डाऊनमध्ये भान ठेवून आयोजित केलेल्या शिबिरात रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!
लॉक डाऊन मध्ये रक्ताचा तुटवडा होत असल्याने निर्माण झालेली रक्ताची टंचाई लक्षात घेऊन खोपोली परळी जांभुळपाडा लोहाना समाज,श्री विमलनाथ जैन संघ खोपोली, बाबूमामा जाधव सामाजिक प्रतिष्ठान खोपोली,लायन्स क्लब ऑफ खोपोली , सहजसेवा फौंडेशन खोपोली व पाऊलवाट मैत्रीची, खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11 ते दुपारी 03.00 या वेळात लोहाना महाजन हॉल, खोपोली येथे समर्पण ब्लड बँक सॅनिटाईझ मोबाईल वँनद्वारा आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास खोपोलीकरांनी उदंड प्रतिसाद दिला.
अतिशय शिस्तबद्ध रित्या या रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले. शासनाच्या सर्व नियमांची अंमलबजावणी करून योग्य ते अंतर राखीत रक्तदात्यांनी रक्तदान केले.खोपोली पोलीस स्टेशन यांनी यासाठी नियोजनबद्ध सहकार्य केले.
समर्पण ब्लड स्टोरेज खोपोली यांनी यासाठी विशेष सहकार्य केले. कोरोना व्हायरस मुळे लॉक डाऊन असूनही सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रक्तदात्यांचे व ज्ञात अज्ञात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आयोजकांनी धन्यवाद मानले..











































