Home मराठवाडा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनसंवाद व सर्वेक्षण.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनसंवाद व सर्वेक्षण.

45
0

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि. २८:- येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा योजना , सेटट्राईब सॉफ्टवेअर सोल्यूशन यांच्या वतीने कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर तालुक्यातील अनेक गावात जाऊन जनसंवाद व सर्वेक्षण करण्यात येत आहे.
कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. किरण आयनेनवार यांच्या नेतृत्वात सरस्वती महाविद्यालय व विभागीय समन्वयक प्रा. डॉ.पंजाब शेरे यांच्या नेतृत्वात बळीराम पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी आपापल्या गावात सर्वेक्षण करीत आहेत. त्यासाठी सारंग वाकोडीकर व मेहर उपलेचवार यांनी जॉटफॉर्म नावाचे ऍप विकसित केले असून याद्वारे माहितीचे संकलन होत आहे.
मांडवा, नागझरी, दिगडी (मंगाबोडी ) येथे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, प्रा. डॉ सुनील व्यवहारे,राष्ट्रीय सेवा योजना यांनी जनसंवाद साधला. यावेळी मांडवा येथील सरपंच माधव सिडाम, ज्येष्ठ नागरिक उत्तमराव मुंढे, नर्सिंगराव इरपेनवार, सदस्य स्वामी चिंतलवार, विलास सटलावार, पोलिस बिट जमादार बॉण्डलेवार, पो. पा. शेख ताजोद्दीन, कृषी सेविका सुनीता गुडेटवार, अंगणवाडी सेविका सुनीता मुंढे, सुनीता आडे, रत्नमाला दासरवार, कल्पना दासरवार, आशा वर्कर आश्विनी जाधव,नागझरी सरपंच रुकमाबाई कुमरे, उपसरपंच आत्माराम मुंढे, ज्येष्ठ नागरिक पांडुरंग मुंढे, ग्रामसेविका शुभांगी वराडे, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका,
दिगडी (मंगाबोडी ) सरपंच ज्ञानेश्वर किरवले, उपसरपंच मारोती आडे, सदस्य प्रल्हाद शेंडे, संतोष अनंतवार, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतमीस उपस्थित होते.