Home विदर्भ इंडिया मेडिकल असोसिएशन आणि असोसिएशन ऑफ इंडिया ऑफ सर्जन द्वारा शासकीय वैद्यकीय...

इंडिया मेडिकल असोसिएशन आणि असोसिएशन ऑफ इंडिया ऑफ सर्जन द्वारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफसाठी 1000 संरक्षणात्मक शरीर सूट आणि संरक्षक नेत्र शिल्ड अधिष्ठाता यांच्या सुपूर्द

33
0

यवतमाळ – सध्या कोविड चा सामुदायिक प्रसार होण्याची भीती दरवाजा ठोठावत आहे, अश्या वेळेस वैद्यकीय महाविद्यालयात प्रोटेक्टिव्ह गियर्सची पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त आहे याची जाणीव आहे. फ्रंट लाइनवर कार्यरत डॉक्टर प्रामुख्याने तरूण नवोदित शिकाउ डॉक्टर आणि पॅरामेडिक्स आहेत. कोविड १९ च्या नियंत्रणाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ नये व त्यांचे कोवीड १९ तसेच इतर जंतू पासून संरक्षण करणे आवश्यक आहे. परंतु शासकीय नियमावली आणि मानके पाळून ते त्वरित मागवणे अश्यक्य असल्याचे आम्हाला समजले, म्हणून इंडिया मेडिकल असोसिएशन यवतमाळ शाखेने ते शिवधनुष्य लवकरात लवकर पेलण्याचे आव्हान घेतले. IMA यवतमाळ ने करोना रिलीफ फंड स्थापन करून त्यात दान करण्याचे आवाहन IMA च्या सभासदांना केले. सोबतच IMA चे जेष्ठ सभासद व संजीवन चे संचालक, डॉ सुनील अग्रवाल यांनी तातडीने उत्तमदर्जाचे संरक्षक सूट मिळवण्यासाठी अथक प्रयत्न सुरु केले.
IMA सभासद आणि असोसिएशन ऑफ सर्जन, डॉ सुरेखा व डॉ भालचंद्र ठाकरे तसेच अमेरिकेत राहणारे यवतमाळ चे नागरिक श्री कुणाल ठाकरे, श्री सुरेंद्र भेळकर, श्री धनंजय पडोळे, कुवैत येथून श्री सचिन सलाम, मुंबई हुन श्री धनंजय शिरे, सौ रुपाली केदार, शहरातील सामाजिक संस्था “यवतमाळ चा राजा”, वसंत बहुदेशीय संस्थाचे सभासद श्री अविनाश महाजन, तसेच शहरातील गणमान्य नागरिक श्री मोहम्मद शाकीर अंसारी, श्री योगेश धोके, श्री राहुल सांगळे, श्री अतुल जगताप, श्री राजू काळे, श्री दिलीप गर्जे, श्री अविनाश ओमनवर, श्री निलेश जाधव, श्री निलेश कडव, कु पद्मजा इंगळे ह्या चिमुकलीने तिच्या खाऊचे पैसे देऊन या आवाहनाला आर्थिक मदत देऊन दातृत्व दाखविले.

या सर्वांच्या सहकार्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत नवोदित शिकाऊ डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिक्ससाठी 1000 संरक्षणात्मक शरीर सूट तातडीने मागवून आणि तसेच संजीवन हॉस्पिटल च्या कर्मचाऱ्यांनी बनवलेले संरक्षक नेत्र शिल्ड, इंडियन मेडिकल असोशिएशन चे अध्यक्ष डॉ संजीव जोशी, सचिव डॉ प्रशांत कसारे, सर्जन असोशिएशन चे अध्यक्ष डॉ अशोक चौधरी व संजीवनचे संचालक डॉ सुनील अग्रवाल यांनी आदरणीय जिल्हाधिकारी श्री देवेंद्र सिंग
यांच्या उपस्थितीत, अधिष्ठाता डॉ मिलिंद कांबळे व डॉ गिरीश जातकर, स्व व ना वै मा, यवतमाळ यांच्या सुपूर्द केल्या.
तसेच कोविड १९ साथी रोग सोडविण्यासाठी आपल्या सर्वांनी घेतलेल्या अथक प्रयत्नांसाठी अभिनंदन केले. जेव्हा संपूर्ण जग या संकटमय परिस्थितीतून जात आहे तेव्हा आम्ही एक IMA यवतमाळ वैद्यकीय तसेच सामाजिक दृष्टिकोन ठेवून जेव्हा प्रशासनाला आवश्यकता असेल तेव्हा वैद्यकीय किंवा इतर कोणतीही सेवा देण्याचे आश्वासन दिले.
हे गुणवत्ताप्राप्त संरक्षणात्मक शरीर सूट लवकरात लवकर उपलबद्ध करून दिल्याबद्धल डॉक्टर सुनील अग्रवाल, हाके ला प्रतिसाद दिल्या बद्धल सर्व IMA सभासद, वेळेवर धावून आलेल्या सर्जन असोशिएशन आणि शहरातील, परदेशातील गणमान्य नागरिकांनी दाखवलेल्या दातृत्व बद्धल, अध्यक्ष IMA डॉ संजीव जोशी व सचिव डॉ प्रशांत कसारे यांनी त्यांचे आभार मानले.

डॉ. प्रशांत कसारे
सचिव आय एम ए
यवतमाळ

Unlimited Reseller Hosting