Home विदर्भ प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्‍व विद्यालय तर्फे गरजु गरीबांना 101 अन्न धान्य किटचे...

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्‍व विद्यालय तर्फे गरजु गरीबांना 101 अन्न धान्य किटचे वितरण

57
0

यवतमाळ – कोरोना संसर्ग व लॉकडाऊन परिस्थिती मध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्‍व विद्यालय यवतमाळच्या वतीने संस्थेच्या मुख्य प्रशासिका ब्रह्माकुमारी मंगला दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ शहरातील बेंडकीपूरा, भरत नगर, ईटभट्टी परिसर, ओम सोसायटी, राम नगर, हनुमान नगर, मुलकी, लक्ष्मी नगर, आदि परिसरातील गरजू व गरीबांना अन्न धान्य किटचे वितरण यवतमाल का राजा नवयुवक गणेश मंडळाच्या सहकार्याने संस्थेचे भाविन भिमजीयानी, हेमंत दौड, यवतमाल का राजाचे सेवक विजय कुमार बुंदेला, नगर सेविका कीर्तिताई राऊत आदिंनी गरजु गरीबांचा शोध घेऊन 15 दिवस पुरेल अशी अन्न धान्याची किट वितरीत केली. या बाबत गरजु बांधवांनी समाधान व्यक्त केले. गरजु बांधवांना ओम शांती मंत्रोच्चार, शिव संदेश, स्वामन कार्ड वितरीत करण्यात आले.

Unlimited Reseller Hosting