Home विदर्भ चिमुकलीने वाढदिवासासाठी जमा केलेले पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले

चिमुकलीने वाढदिवासासाठी जमा केलेले पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले

157

यवतमाळ / आर्णी , दि. १३ :- महामारीचे उपाययोजना करताना सरकारला तारेवरची सर्कस करावी लागत आहे. देशात आधीच मंदी असताना कोविड 19 ने जो थैमान घातला आहे यामुळे केंद्र व राज्य सरकार यांचे आर्थिक कंबरडे मोडले असल्याचे स्पष्ट झाले असताना एक बारा वर्षीय मुलीने वर्षभरापासून आपल्या वाढदिवसासाठी जमा केलेले संपूर्ण पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता देऊन देश सेवेचा एक नवीन पायंडा पाडला आहे.

एकीकडे कोविड 19 विषाणू ने थैमान घातल्यामुळे संपूर्ण जगच लॉकडाऊन झालेले आहे. कोरोनाच्या संक्रमानामुळे जागतिक महामंदीचे गडद सावट भारतावर सुदधा पडले आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात सरकार कुठेतरी आर्थिक दृष्ट्या दुर्बल झाल्यासारखे वाटत होते. त्यामुळे संपूर्ण देशभरातून केंद्र सरकार व राज्य सरकार ला आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाल्याचे चित्र मीडिया मधून पाहायला मिळाले. सरकारला सुरू असलेल्या मदतीमुळे प्रेरित होऊन आर्णी शहरातील श्री म द भारती विद्यालय येथील इयत्ता पाचवी मधील 12 वर्षीय जोया आरिफ शेख या सामान्य घरातील मुलीने वर्षभर आपल्या वाढदिवसासाठी जमा केलेला खाऊंचा पैसा महाराष्ट्र सरकारला कोरोनाच्या लढ्या करिता देण्याची मनीषा आपल्या वडिलांकडे बोलून दाखविली,आपल्या मुलीच्या निर्णयाचे स्वागत करीत वडील आरिफ शेख यांनी तात्काळ याबाबत निर्णय घेऊन हा निधी तहसीलदार धीरज स्थूल यांच्या मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधी करीत सुपूर्द करण्यात आला. जोया हिने सामाजिक जाणिव ठेवत घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून दातृत्व आपल्या देशाच्या रक्तातच असल्याने अश्या कितीही मोठ्या संकटाचा सामना भारतीय करू शकतात अशी शाश्वती या चिमुकलीच्या त्यागातून निर्माण झाली आहे. यावेळी आर्णीचे ठाणेदार यशवंत बाविस्कर,मुख्याधिकारी अमोल माळकर,आरोग्य तालुका अधिकारी श्यामकुमार शिंदे,आरिफ शेख,फयाज सय्यद व युनूस शेख उपस्थित होते..