Home जळगाव शिरसोली येथील गरजूंना मनियार बिरादरी तर्फे धान्य वाटप

शिरसोली येथील गरजूंना मनियार बिरादरी तर्फे धान्य वाटप

16
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्य़ातील शिरसोली येथे कोरोनामुळे लॉक डाउन असल्याने हात मजुरी करणाऱ्यासह ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे तेथील काही जबाबदार व्यक्तींनी मनियार बिरादरी शी संपर्क साधला असता मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, संचालक सलीम मोहम्मद ,ताहेर शेख, अब्दुल रऊफ टेलर व मोहम्मद आबिद यांनी त्वरित शिरसोली येथे धाव घेऊन ज्या गरजू लोकांकडे रेशन कार्ड नाही व ज्यांच्या घरी रेशन संपलेले होते अशा तीस गरजूंना प्रत्येकी पाच किलो तांदूळ व पाच किलो गहू, दोन किलो तूर डाळ ,एक लिटर तेल व पाव किलो चटणी अशा स्वरूपाने मदत केली.
अशाप्रकारे नव्वद लोकांचा दररोज 30 कीट प्रमाणे मदत देण्यात येणार असल्याचे सुद्धा फारुक शेख यांनी तेथील लोकांना आश्वासन दिले.

*जळगाव शहरात सुद्धा वाटप सुरूच*
मनियार बिरादरी तर्फे सुरू असलेल्या धान्य वाटपात जळगाव शहरातील विविध भागात सुद्धा धान्य वाटप सुरू असून या दोन दिवसात खालील परिसरातील गरजवंतांना धान्य चे किट वाटप करण्यात आले
१) पिम्पराला हुडको ४ किट
२)तांबापुर मच्छी बाजार मागे ४ किट व शाह अवलिया मस्जिद जवळ ६ किट
३)शाहु नगर १७ किट
४)रजा कॉलोनी-दत्त नगर मेहरून ३किट,
५)गेंदालाल मिल ११ किट
६)प्रभात कॉलोनी २ किट,
७)जैनाबाद २ किट,
८) पिम्पराला हुडको नगर सेवक ज़ाकिर पठान देत असलेल्या जेवना साठि 200 किलो तांदुल
९)गेंदालाल मिल मधे 200 किलो गहु वाटन्यासाठी रईस शेख,शिवसेना महानगर उप अध्यक्ष यांना सुपुर्द

*सामाजिक संघटनांना आवाहन*
शहरात ज्याप्रकारे विविध सामाजिक संघटनांनी रेशन किट वाटप केले त्याच धरतीवर जर जळगाव तालुक्यातील मोहाडी,बोरनार शिरसोली ,असोदा ,भादली, नशिराबाद, कुसुंबा या ग्रामीण भागात सुद्धा अनेक गरजू असून त्यांच्याकडे रेशन कार्ड सुद्धा नाही अशा लोकांना सर्वांनी मिळून मिसळून मदत करावी व त्यासाठी संयुक्त कार्यक्रम आखावा असे सुद्धा आव्हान फारुक शेख यांनी केलेले आहे.