Home मुंबई संपूर्ण सहकार्य केल्यास टाळेबंदी पुन्हा वाढवावी लागणार नाही –  उपमुख्यमंत्री अजित पवार...

संपूर्ण सहकार्य केल्यास टाळेबंदी पुन्हा वाढवावी लागणार नाही –  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना घरातच थांबण्याचं आवाहन

19
0

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

मुंबई – दि. ३० एप्रिलपर्यंत सर्वांनी सहकार्य केल्यास, पुन्हा टाळेबंदी वाढवावी लागणार नाही. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि प्रसार रोखण्यासाठी राज्यातली टाळेबंदी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे सांगून नागरिकांनी या निर्णयाला पाठिंबा, सहकार्य देण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. राज्याच्या काही भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येनं सापडत आहेत. तिथला संसर्ग रोखण्यासाठी संबंधित गावे, वाड्या, वस्त्या, सोसायट्या सील केल्या जात आहेत. यामुळे सध्या गैरसोय होत असली तरी लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे आवश्यक आहे.

आपला व आपल्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी सरकारने टाळेबंदी वाढवली आहे. लोकहितासाठी घेतलेल्या ३० एप्रिलपर्यंतच्या टाळेबंदीला राज्यातील जनतेनं सहकार्य करावं. प्रत्येकानं घरातंच थांबावं, डॉक्टर, पोलिस, शासकीय यंत्रणांना सहकार्य करावं. ही टाळेबंदी यशस्वी झाली तर कदाचित पुन्हा टाळेबंदी वाढवावी लागणार नाही, याचा विचार करुन राज्यातल्या प्रत्येकानंच कोरोनावर मात करण्यासाठी कटिबद्ध होऊया, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.