Home मुंबई चारकोप विधान सभेतील गरीब जनता हवालदिल , हॅलो आमदार साहेब लक्ष द्याल...

चारकोप विधान सभेतील गरीब जनता हवालदिल , हॅलो आमदार साहेब लक्ष द्याल का ?

36
0

सुरेश वाघमारे

मुंबई – संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे सर्वत्र कोरोनाच्या भीतीने हाहाकार मजला असून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दाहिदिशावरून आलेले बेडबिगार .कामगार मिळेल ते काम करून आपले जीवन व्यथित करणारे कष्टकरी यांच्या हालअपेष्ठा दिवसेंदिवस खूपच गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे भयावह चित्र चारकोप विधानसभेत अनुभवाया मिळत असून या विभागातील चारकोप गाव येथील रोजनदारीवर काम करणारे कामगारवर्ग हाताला काम नसल्यामुळे पोटाची आग विझविण्यासाठी अगदी हवालदिल झाले असून या गंभीर बाबीकडे कुठलाही लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाही .मात्र विभागातील काही सामाजिक संस्था पुढे सरसावल्या असून त्याच्या परीने ते या भुकेल्यानं घास भरवण्याचं काम अगदी निस्वार्थपणे करीत आहेत . याबाबाबत आमचे प्रतिनिधी सुरेश वाघमारे यांनी आमदार योगेश सागर याना व्यक्तिशः फोन केला आणि या विभागातील चारकोप गाव लक्षमी नगर . भाब्रेकर नगर येथील लोकांच्या जेवणाची सुविधा करावी अशी विंनती केली असता त्यानी मी रोज ५०० लोकाना जेवण पुरवत असून मी सुद्धा माणूस आहे .त्यावर वाघमारे यांनी साहेब काही नितान्त गरजू लोकांची लिस्ट व्हाट्सअप सुद्धा पाठविली त्यावर योगेश सागर यांनी ओक्य असे उत्तर सुद्धा दिली मात्र हप्ता उलटून गेला काहीच मदत मिळाली नाही . १ लाख मते घेऊन निवडून आलेले योगेश सागर हे जनतेच्या जीवावर विधानसभेत प्रतिनिधित्व करतात मात्र त्याच जनतेच्या वेळप्रसंगी फक्त देवाला नेवेद्य दाखविल्या सारखे ५०० लोकाना देणे म्हणजे नाममात्र असू शकते किमान हातावरच्या ५००० लोकांना उदरनिर्वाह करण्याची तसदी घ्यायाला पाहिजेत पण तसे होताना काही दिसत नाही . आता पुन्हा लॉकडाऊन वाढविला असून या झोपडीत राहणार मजूर कामगार वर्ग अगदी होरपळत चालला असून ” नेते तुपाशी आणि जनता उपाशी “ ची अनुभूती या मतदार संघात दिसून येत आहे .या मतदार सांगतील काही लोकांची मते जाणून घेतली यावेळी गटइ कामगार चे नेतृत्व करणारे दादाभाऊ माने यांची प्रतिकीर्या घेतली यावर ते म्हणाले कि १६ व्या दिवशी मला २० कूपन्स आमदार साहेबांकडून मिळाले आता माझ्याकडे खूप लोकांची मागणी आहे त्याचे जगणे कठीण झाले असून हे २० कूपन कुणाकुणाला वाटप करून त्यामध्ये ५ किलो पीठ ….किलो डाळ वगैरे हे सर्व शक्य नाही . योगेश सागर हे गेल्या १५वर्षापसून या चारकोप मतदार संघाचे आमदार आहेत .त्याना कोण तुपाशी खात कोण उपाशी राहत याची कल्पना असेलच , म्हाडा वसाहतीत राहणारे आज तेही घरी बसलेत त्याना हि मदतीची गरजआहे मात्र या मतदार संघातील आढावा घेत शोध पत्रकारिता करीत असताना आमचे प्रतिनिधी वाघमारे यांनी माहिती घेतली कि फक्त तोंड बघून भाजपच्या लोकांनी वाटप केली ज्यांना काहीच गरज नाही ज्यांच्या अंगावर किलोभर सोने आहे आशयाना खुश करण्यात भाजपवाल्यानी धन्यता मानली .चारकोप गाव लक्ष्मी नगर येथील सामाजिक कार्यकर्ते विलास हिवाळे यांनी सांगितले कि मी आमदार साहेबाना २८ कुटुंबाची यादी पाठविली होती मात्र त्यामधून फक्त ५ लोकांना थोडेंबहू रेशन मिळाले आहे नन्तर करू असे आश्वासन मिळाले मात्र लोक खूप चिंतीत असून रोजची चूल पेट्ने कठीण होऊन बसले असून भारतीय बौद्ध महासभा चारकोप शाखेच्या वतीने ४ दिवस जातील एव्हढेतरी रेशन मिळाले यावरून स्पष्ट निदर्शनास येते कि कोरोनाच्या महामारीमध्ये फक्त माणुसकीच कामी येत असून सामाजिक संस्था पुढाकार घेताना सर्वत्र दिसत आहेत .सध्यातरी नेत्यांमध्ये जनतेप्रती संवेदनशीलता जराही उरलेली दिसत नाही खूप मोठी शोकांतिका आहे .सामाजिक कार्यकर्ते राजेश मंजाळ यांनी अंगावर काटे येतील असे मनोगत व्यक्त केले जनता भूकबळीने नक्कीच मरतील असे हृदय हेलावून टाकणारे मनोगत व्यक्त केले जीवन कसे जगावे यासाठी खूप लोक कॉल करत आहेत साहेब कुठून काय मदत होते का ते बघा अशी विंनती करीत होते .तरी कुठलाही नेता मदतीला येत नसून नोटरीचेबल.

नाहीतर कॉल घेत नाहीत यावेळी जुन्या गाण्यातील काव्यपंक्ती चा नाविलाजाने अपभ्रन्स करत शब्दावर बलात्कार करीत खरंच””म्हणावं लागत दोस्त दोस्त ना रहा नेता दाता ना रहा प्यार प्यार ना रहा जिंदगी मुझे तेरा ऐत बार ना रहा*लोक अजून लॉकडाऊन वाढल्यामुळे अजूनच टेन्शनमध्ये आले आहेत आजची भाब्रेकर नगर येथील नागरिक मछिंद्र माने यांनी सांगितले कि कोणताही नेता आमच्याकडे मदतीला फिरकलेच नाही .बौद्ध समाज बांधवांची लिस्ट आहे पण कुठून काही मिळत नाही त्यामुळं डोकं काम करत नाही .आदर्षनगर साईडला थोडस फोटो सेशन झालं रेशन वाटपच असे समजले आमदार सागरसाहेब मदत आपल्या पदाधिकार्यांना सूचना देतही असतील तरी पदाधिकारी मात्र आपल्या सोयीच्या लोकांचे घर भरत असतील असे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले जात आहे या गंभीर वेळी आमदार साहेबानी लक्ष देण्याची नितांत गरज आहे असे भोळ्या भाबड्या गरीब कष्टकरी रोजनदारीवर काम करणाऱ्या उपाशी पोटाची आक्रोशाची हाक आहे .

Unlimited Reseller Hosting