Home जळगाव बोदवड येथे किराणा वाटप करून घडविले हिंदू – मुस्लिम एकतेचे दर्शन

बोदवड येथे किराणा वाटप करून घडविले हिंदू – मुस्लिम एकतेचे दर्शन

28
0

रावेर – शरीफ शेख

जळगाव जिल्ह्य़ातील बोदवड येथे किराणा वाटप करुन घडविले हिंदू – मुस्लिम एकतेचे दर्शन…

– कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.त्यामुळे शहरातील सैय्यद फारुक सैय्यद कदीर बागवान यांनी संपुर्ण शहर भरातील वंचित,गरिब,हातावर पोट भरण्या-यांना संपुर्ण किराणा साहित्य वाटप करून माणुसकी धर्म निभावत हिंदु-मुस्लिम एकतेचे दर्शन घडवून आणले.

यात त्यांनी आपल्या स्व:खर्चाने गहू ८० क्विंटल,तांदूळ ११ क्विंटल,तेल,साखर १२ क्विंटल,चहापावडर कांदे,यांसह किराणा साहित्य वाटप करून गोरगरिबांच्या जेवनाची सोय लावून दिली.
राज्यात संचारबंदी लागू असल्याने शहरातील गोरंगरिब,हातावर पोट भरणा-यांची उपासमार होवू नये यासाठी शहरातील सैय्यद फारुक सैय्यद कदीर बागवान यांनी संपुर्ण शहरातील हिंदू-मुस्लिम समाजातील गरजू व गरिब कुटुबीयांना हे किराणा साहित्य वाटप करून मदतीचा हात दिला तर यानिमित्ताने पुन्हा एकदा शहरात कायम असलेले हिंदु-मुस्लिम एकतेचे दर्शन पाहावयास मिळाले.

Unlimited Reseller Hosting