Home विदर्भ वर्धा जिल्ह्यात प्रवेशाअगोदर होणार चेक पोस्टवरच वाहनांचे निर्जंतुकीकरण.!

वर्धा जिल्ह्यात प्रवेशाअगोदर होणार चेक पोस्टवरच वाहनांचे निर्जंतुकीकरण.!

28
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

करोनाबाधित जिल्ह्यातून होणारी भाजीपाल्याची आवक थांबविण्यात आली.

वर्धा – एकीकडे राज्यभरात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सुदैवाने वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र तरीदेखील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. आणखी खबरदारीचा उपाय म्हणून आता 16 नाक्यांवर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंच्या वाहनांचे चेक पोस्टवरच निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. शिवाय यासाठी खास प्रणाली बसवण्यात येत आहे. यामुळे बाहेरून येणाऱ्या वाहनांमार्फत जिल्ह्यात करोनाच्या प्रवेशास प्रतिबंध बसणार आहे.
करोनामुक्त जिल्हा ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. शिवाय करोनाबाधित जिल्ह्यातून होणारी भाजीपाल्याची आवक थांबविण्यात आली आहे, तर वर्धा जिल्ह्यातून करोनाबाधित जिल्ह्यात वाहतुकीसही प्रतिबंध लावण्यात आलेला आहे.

इतर जिल्ह्याच्या सीमा वर्धा जिल्ह्याला मिळणाऱ्या 16 ठिकाणी प्रशासनामार्फत तपासणी नाके लावले आहेत. यामध्ये सेलडोह, शिरपूर, आपटी फाटा (पुलगाव), वानरवीर (हिंगणी), येरला, बडबडी, अंदोरी, देऊरवाडा, खडका, सावळी(जुनापाणी), दुर्गवाडा,(वरुड- आष्टी), बेलोरा, कापशी, खेक, गिरड, खांबाडा ( समुद्रपूर- चंद्रपूर ) या ठिकाणांचा समावेश आहे. इथे स्थिर निगराणी पथक तैनात आहे.
करोनाचा प्रादुर्भाव वर्धा जिल्ह्यात होऊ नये म्हणुन वर्धा जिल्ह्यातील या 16 तपासणी नाक्यावर आता अत्यावश्यक वस्तू घेऊन येणाऱ्या प्रत्येक वाहनाचे निर्जंतुकीकरण होणार आहे. यासाठी प्रत्येक नाक्यावर 4 पंप ठेवण्यात आले आहेत. तसेच 24 तासांसाठी तीन पथके प्रत्येकी 8 तास काम करणार आहेत. निर्जंतुकीकरणासाठी 1 टक्के हायपोक्लोराईड द्रावणाचा उपयोग करण्यात येईल. स्थानिक मजुरांच्या सहकार्याने येणारी जड वाहने निर्जंतुक करण्यात येतील. त्याच सोबत प्रत्येक नाक्यावर आरोग्य पथक ड्राइवर, क्लिनर, यांची वैद्यकीय तपासणी करणार आहे. वाहनासोबत जास्तीत जास्त ड्रायव्हरसह तीन लोकांनाच आतमध्ये प्रवेश मिळणार आहे. याच प्रणालीची आज जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी वर्धा-नागपूर मार्गावरील सेलडोह येथील तपासणी नाक्यावर पाहणी केली..

Unlimited Reseller Hosting