Home महाराष्ट्र कोरोनाशी भिडत समाजात वृत्तांकन करता तुमची काळजी कोण वाहत रे पत्रकार भावा?

कोरोनाशी भिडत समाजात वृत्तांकन करता तुमची काळजी कोण वाहत रे पत्रकार भावा?

137
0

तुम्ही राबता तुमची अडचण काय?असं माध्यमांनी व समाज व सरकारने कधी तुम्हाला विचारले का

कारे पत्रकार भाऊ तुला काही मदत हवी का?

तुमची कदर करतंय कोण?
खेड्यांपाड्यावरील शहरातील वस्तीत पत्रकारिता करणे म्हणजे काट्याची कसरत,धडपड असते,केवळ राब-राब राबने,वरिष्ठांच्या सूचना पाळणे,वृतांकणासाठी स्वतःचे वाहन,त्यामध्ये इंधन,मोबाईल टोकटाइम खर्च,नेटचे रिचार्ज,वेळ,फिल्डवर चहा,नाष्टा खर्च,प्रसंगी उपासमार अश्या कित्येक खर्च,कित्येक सोपस्कार करावे लागतात , बदल्यात मिळणारे तुटपुंजे मानधन किती विचाराल तर लाज वाटते सांगायला?साधा महिन्याच्या मोबाईल टोक टाइम नेट रिचार्ज इतके तरी असते का?अहो कित्येकांना तेही मिळत नाही? केवळ राबायचे , मिरवायचे? “नाव मोठं खिश्यात खोट” अशी दरिद्री भोगणारे खेड्यां पाड्यात,शहरात उन्हात, पावसात,थंडीत जीव काढणारे असंख्य पत्रकार आहेत , पत्रकार बंधूनो,तुमच्या कष्टाची कदर होते का?
या सगळ्या कष्टाचे चीज काय?
हो ठीक आहे सामाजिक घटना घडामोडी मांडता? कित्येकदा समजातील कायदा सुव्यवस्था टिकवण्यात तुमचा मोठा हात , पोलीस , डोकटर , वकील , नेते , समाज , सरकार , शासकीय अधिकारी , समाजातील शेतकरी , गरीब मजूर , संघटना चालक , सामाजिक कार्यकर्ते,सामाजिक संस्था,उद्योजॅक असे कित्येकांचे भले त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्यास त्यांना वाचा फोडनारे तुम्ही पत्रकार?
तुम्हाला पत्रकार म्हणून तुमच्या कष्टाची कदर व त्याची किंमत काय?
मग हे करतांना , अपघात झाला,मारहाण झाली तर कोण तुमच्या दिमतीला? मदतीला येईल?सांगा पाहू? मग अख्खे आयुष्य पत्रकारितेत राबणारे कित्येक पत्रकार त्यांचे वर्तमान व भविष्याची पर्वा किंमत सरकार समाज माध्यमे , माहिती विभाग याना आहे का?
तुम्हाला श्रमिक म्हणून मान्यता तरी आहे का?
तुमची माहिती विभागात पत्रकार म्हणून नोंद तरी आहे का?
तुम्हाला अधिस्वीकृती मिळाली का?

तुमच्या मुलांना शालेय फी सवलत तरी आहे का?
तुम्ही दारिद्ररेषेत आहे का?तुम्हाला पुरेसे धान्य रेशन मिळते का?
तुमच्यातील वतनदार सोडा मात्र बहुतांशी ८० टक्के ग्रामिन भागातील शहरी वस्तीत पत्रकारितेसाठी धडपडणारा हा वर्ग त्याचे कौटुंबिक प्रॉब्लेम तरी सरकार समाज व तुम्ही ज्यांच्यासाठी वृत्ते देऊन त्यांना मोठे केले न्याय दिला त्यांना तरी कदर(काळजी) आहे का?
अहो कागद काच पत्रा वाचणारे बांधव भगिनी संघटित आहेत , मजूर , असंघटित बांधकाम कामगार , शेतमजूर एकत्रित आलेत आपल्या हक्कांसाठी लढतात,दारिद्र रेषेखालील योजना , रेशन कार्ड , घरकुले , म्हाडा घरकुले , मुलांना स्कॉलरशिप मिळवतात , कामगार उपयुक्त कार्यालयात श्रमीकतेच्या योजना मिळतात,मात्र पत्रकार म्हणून कार्यरत ग्रामीण भागातले व शहरी वस्त्यांतील पत्रकार यांना कोण्ही वाली आहे का?
पूर असो की दुष्काळ असो की दंगल किंवा प्रसंग कुठलाही बाका असो फिल्डवरील पत्रकार हे सतत जागे राहतात,आपले लेखन करतात,वृत्ते स्टोरी बनवतात,मात्र त्यांच्या आपत्कालीन पत्रकारितेचा ना सन्मान ना त्याचा मोबदला? अहो केवळ जाहिराती मिळवा 15 टक्के मिळवा मात्र जाहिराती मिळवणे हेही अवघड आहे . सडेतोड लेखन करणार्यांना कुठे मिळतात जाहिराती? मात्र जबाबदारी पेलण्यात जिंदगी जाते?हातपाय थकल्यावर ना पेंशन ना फंड ना आधार अख्खे घरदार उघडे पडते हे असंख्य वार्ताहरांचे आयुष्य आहे मात्र लिहायला मंडळी लाजतात, घाबरतात का पण? अरे साऱ्या जगाची चिंता करता? तुम्हाला घरेदारे आहे का? कुटुंबे आहेत ना? मुलांची शिक्षण फी आहेना? घरखर्च, आजार पाजार , सण , उत्सव आहे ना? तुम्ही ही माणसे आहेत ना? घराचे भाडे , घरपट्ट्या , कर , वीजबिल कसे भागवता? याची पर्वा ज्यांच्यासाठी आरसा बनले त्यांना तरी हे आपले मुद्दे धड कळते का? का नाही? तर आपल्याला नेतृत्व नाही जे आहे ते स्वतःच भरत त्याला जाणीव नेनिव असते का? लुटूपटू आंदोलने , निवेदने अहो कोण बघतो? कोण त्यावर गौर करतो? याची चिंता कोण करतो हो? अहो जिथं राबला तिथं तरी म्हातारपणात ओळ्खतील का? आजारात साथ मिळेल का?याची पर्वा कधि करणार? अजून किती पिढ्या मातीत घालायच्या?
कोरोना महामारीत तुमचे कोण?
महामारीत तुम्ही तळागाळात जातात वृत्ते देतात,तुमची किती काळजी घेता? हे कोण विचारतो? तुम्ही धोका पत्करता मात्र तुमच्या घरच्यांचे कसे होईल? तुमच्या घरी कोण्ही उपाशी आहेंका? तुमची आर्थिक अडचण आहे का? असा फोन आपले माध्यम करत का?कोण्ही सामाजिक संस्था , मंडळे , लोकं , सरकार मदत देते का? अहो उत्तर आहे , की तुम्ही गृहीत आहेत की तुमचे भले आहे तुम्ही मेले की उपाशी राहिले तर पर्वा कोन्हाला? अशी आपली गत असंख्य ग्रामीण / वस्तीतील पत्रकार गरिबी रेषेच्याखाली त्यांना कोणी वाली नाही .
आम्ही वारंवार सरकारला पत्रकारांचे शासकीय दप्तरी नोंद व्हावी त्यांची कौटुंबिक आर्थिक स्थितीची गणना व्हावी , याची मागणी आम्ही सतत करीत आहोत मात्र अजूनही गांभीर्य नाही जिल्हा माहिती कार्यालय फक्त अधिस्वीकृती वाले पत्रकार यांचीच नोंद ठेवतात तर तुम्हाला प्रेस ला ही बोलवत नाही हे वास्तव आहे मात्र सामाजिक व शासकीय कार्यक्रम असला की आपण सर्वात पुढं असतो हो , फायदा मात्र आपला कसुभरही होत नाही , लढतो आपण फायदा दुसर्यानाच होतो , एक साधी योजना सरकार आपल्याला देत नाही की , आपली मुलं शाळेत सवलत मिळवतील? नाही हो…, घरात किराणा नसतो मात्र कामात आपण सर्वात पुढं? थोडा विचार करा,अजूनही कित्येक पत्रकारांना पुरता रोजनार नाही की गावागावात त्यांना व्यवसाय नाही,कीं त्यांना कर्जही मिळत नाही,त्यात सडेतोड लिहिणाऱ्या वार्ताहराला कोण्ही व्यवसायाला जागा देत नाही,उलट बातमीत नाव कट झाले,तर दम दाट्ट्या नेहमीच्याच,आपले सगळे वैरी आपण मात्र सगळ्यांचे पालकत्व घेतो,सर्वांची काळजी वाहतो,स्वतः मात्र तीळ तीळ मरतो,हे सत्य कबुल करा
मित्रांनो ३० वर्षाहून अधिककाळ या क्षेत्रात आहे,जाणीव नेनिव आहे,अन स्पष्टपणे संवाद करणारा,मांडणारा आहे,अनेक क्षेत्रात कार्यरत आहे,कलाकार आहे,संघटक,व्याख्याता,संवाद माध्यम क्षेत्रात सामाजिक सेवा म्हणून राबतोय,कोण मला जागवत,जगवत,हे।माझं सत्कर्म आहे , मात्र अडचणी अपार असल्या तरी भविष्य अंधःकार मय आहे हे जाणवत, कारण माझ्यासारख्या कीत्येकांची इथं माती झाली आहे हेच आपल दुर्दैव आहे,
कारण आपण केवळ अविर्भावात जगतोय,
स्वतःला काही समजतच नाही ,आपण स्वतःतील स्वत्व जाणत नसल्याने आपले मुद्दे अडचणी आपण दडवतो, व उर तानत जगतो,हेच आपले अपयश दुसरं काय?

आपला –
श्री राम खुर्दळ

(राज्यउपाध्यक्ष)
पत्रकार संरक्षण समिती , महाराष्ट्र

Unlimited Reseller Hosting