जळगाव

कॅन्सरग्रस्त नवरी गुलनाज व तोहसीम खान यांच्या प्रेमाच्या अंत…!

Advertisements

लियाकत शाह

जळगाव – कासोदा तालुका एरंडोल येथील तोहसीम खान याच्या साखरपुडा त्याच्या मामाची मुलगी गुलनाज तिच्याशी २०१८ मध्ये मोठ्या थाटात संपन्न झाला होता परंतु नंतर गुलनाज च्या डाव्या हाताला दुखायला लागला त्यांनी जळगाव येथे जाऊन तिच्या उपचार केला परंतु डॉक्टरांनी सल्ला दिले की की तुम्ही मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये घेऊन जा त्यांनी तेथे घेऊन गेले डॉक्टरांनी कॅन्सर असल्याचे निदान केले तिच्या आपरेशन करण्यात आला तो यशस्वी झाला परंतु सहा महिन्यानंतर पाठाच्या मणका दुखू लागला परत यांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल केले डॉक्टरांनी सल्ला दिली की ही थोड्या दिवसाची पाहुणी आहे तिला घरी घेऊन जा घरी आल्यावर तिचे दोन्ही पाय निर्जीव झाले होते तिच्या विवाहाची मुहूर्त सात फेब्रुवारी रोजी ठरली होती तोहसीम खान तिच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला त्याच्या या निर्णयाने सर्वच दंग झाले तिच्या विवाह इस्लामी धर्मानुसार लावण्यात आला या विवाह सोहळ्यात गावातील प्रतिष्ठित हिंदू मुस्लिम बांधवांनी उपस्थिती देऊन आशीर्वाद दिले याप्रसंगी तोहसिम खान यांनी आपल्या तरुण मित्रांना उपदेश दिले की आपल्या जोडीदाराला कोणत्याही परिस्थितीत सोडू नये तिच्या सुखात व दुःखात सामील व्हा शेवटी दिनांक ११ एप्रिल रोजी रात्री गुलनाज चे निधन झाले कोरोना च्या पार्श्वभूमीवर मालवाहू रिक्षातून मोजक्या भाऊ बांधवांनी अंत्ययात्रेत सामील होऊन दफनविधी केली ही बातमी गावात कळाल्यानंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

You may also like

जळगाव

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी केली जम्बो कार्यकारिणी जाहीर… आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप…

अमळनेर  –  येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी आमदार अनिल ...
जळगाव

ज्येष्ठ नागरिक संघाच्या बहुउद्देशिय सभागृहाचे भूमिपूजन संपन्न

रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या संकल्पित बहुउद्देशिय सभागृहाच्या ...
जळगाव

आरटीई नुसार झालेल्या प्रवेशप्रक्रियेच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वावडदा येथील पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले निवेदन रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश ...