Home मराठवाडा सिंदखेड पोलिसांत आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्या बद्दल गुन्हा दाखल…!

सिंदखेड पोलिसांत आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्या बद्दल गुन्हा दाखल…!

96
0

मजहर शेख

नांदेड / माहूर , दि. १२ :- गंगाजीनगर येथील अविनाश शंकर भोयर याने दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल, अशा पद्धतीने कोरोना विषाणू संसर्ग संदर्भात फेसबुक या सोशल मीडिया वरून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्यामुळे सिंदखेड पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असताना राज्यामध्ये काही समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दिनांक ०३ एप्रिल रोजी एक कोटी भाजपा समर्थक या फेसबुक ग्रुप वर गंगाजी नगर येथील अविनाश शंकर भोयर याने आज पासून सर्व लोकल मुस्लमांनाकडून सुद्धा सामान घेणे बंद ना.. अंडी ना ब्रेड.. बंद म्हणजे बंद अशी पोस्ट शेयर केली.या विषयी मोफिख खान गोंडवडसा यांनी सिंदखेड पोलिसात रितसर तक्रार दिली होती.या तक्रारी ची सत्यता पडताळून सिंदखेड पोलिस ठाण्याचे जमादार भारत गबरू राठोड यांनी सरकार पक्षाकडून फिर्यादी होऊन दिलेल्या फिर्यादीत जिल्हाधिकारी यांनी कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधित उपायोजना करणे बाबत सोशल मीडिया, व्हाट्सअप, फेसबुक, एसएमएस व इतर कोणत्याही सोशल नेटवर्किंग द्वारे जातीय / धर्मीय तेढ वरील आक्षेपार्ह मजकूर इत्यादी वापरावर प्रतिबंध केला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून अविनाश शंकर भोयर रा.गंगाजी नगर (करंजी) याच्या विरुद्ध भादवी कलम १५३ अ १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर हे करीत आहेत.

Unlimited Reseller Hosting