मुंबई

पुन्हा पोलिसावर दुचाकीस्वारांचा हल्ला, सपोउनि उत्तम राऊत यांच्या जबड्याचे हाड फ्रॅक्चर, डोळ्याला, ओठाला, हाताला गंभीर जखमा

Advertisements

विषेश प्रतिनिधी – राजेश भांगे

मुंबई – कोरोनाची लागण होऊ नये यासाठी गर्दी करून, घरातच राहा, असे आवाहन करत रात्र न् दिवस पोलीस कर्तव्य बजावत आहे. असे असताना औरंगाबादमध्ये घडलेल्या घटनेची पुनावृत्ती मुंबईतील मालाड परिसरात घडली. कर्तव्यावर असलेल्या मालाड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस पोलीस उपनिरीक्षक उत्तम राऊत (५४) यांना दुचाकीचालकाने अंगावर दुचाकी अंगावर घालून मारहाण केली. या मारहाणीत राऊत यांच्या जबड्याचे हाड फ्रॅक्चर, डोळ्याला, ओठाला, हाताला गंभीर जखमा झाल्या. दरम्यान, हल्ला करून पळालेल्या दुचाकीस्वार ३ तिघांच्या बांगूर नगर पोलिसांनी पाठलाग करून मुसक्या आवळल्या. या आरोपींपैकी एक जण अल्पवयीन (१७ वर्षांचा) आहे. सध्या सपोउनि राऊत यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
१० एप्रिल रोजी मालाड वाहतूक विभागांतर्गत बांगुर नगर पोलीस ठाणे समवेत भगतसिंग रोड नं. १, साठे चौक , लिंक रोड, गोरेगाव (प) मुंबई या ठिकाणी बांगुर नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांच्यासह वाहतूक शाखेचे उत्तम राऊत व ३ अंमलदार नाकाबंदी करत होते. सायंकाळी १७.३५ च्या दरम्यान काळ्या रंगाच्या Activa वरून ३ तरुण गोरेगावच्या दिशेने ओसीवरकडे साऊथ बाऊंडने आले. दुचाकी चालकाने हेल्मेट घातले नव्हते तसेच तिघांनीही मास्क लावले नव्हते. ते पाहून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राऊत यांनी दुचाकी चालकाला थांबण्यासाठी इशारा केला. मात्र दुचाकी चालकाने दुचाकी सपोउनि राऊत यांच्या अंगावर घातली आणि मागे बसलेल्या तरुणाने सपोउनि राऊत यांना लाथ मारली. त्यामुळे सपोउनि राऊत तोंडावर पडल्याने गंभीर जखमी झाले. क्षणाचा विलंब न लावता कर्तव्यावर हजर असलेल्या हवालदार जाधव यांनी बांगुर नगर पोलीस ठाण्याच्या मोबाईल -१ मधून गंभीर जखमी झालेल्या सपोउनि राऊत यांना जोगेश्वरी येथील ट्रामा केअर रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, मारहाणीनंतर शिवीगाळ करत ठेंगा दाखवून पळालेल्या दुचाकीस्वारांचा बांगुर नगर पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक गुंजकर उपनिरीक्षक शिंदे मालाड वाहतूक विभागाचे रायडर सावंत व पोलीस शिपाई उमराणी यांनी पाठलाग करून तिघा दुचाकीस्वारांच्या ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुसक्या आवळल्या.
सपोउनि राऊत यांच्या उजव्या डोळ्याच्या भुवई जवळ, तोंडाच्या आतील भागात ओठावर जखम, तसेच उजव्या हाताच्या कोपरा जवळ खरचटले होते. सिटी स्कॅन केले असता सपोउनि राऊत यांच्या जबड्याचे हाड (Maxillary Bone) फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील उपचारासाठी सपोउनि राऊत यांना गोरेगाव येथील लाईफ लाईन रुग्णालयात ( Lifeline Hospital, Near MTNL, Goregaon, west) दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या प्रकरणी बांगुर नगर पोलीस ठाण्यात ( गु.र.क्र. १६५/२०) भादंवि कलम ३०७, ३५३, ३३८, २७९, २६९, १८८, ३२३, ५०४, ३४ सह, ३४(a),(b),१३०(1) ३/१८१,१२८,१२९/१७७ मोटर वाहन कायदा,५१(b) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये गुन्हा दाखल करून १७ वर्षीय दुचाकी चालकाला ताब्यात घेण्यात आले तर विजय मोहन यादव (२३ ), विनोद सिद्धार्थ भालेराव (२१) यांना अटक करण्यात आली.

या घटनेवरून एकच सांगणे, महामारी आहे. कोरोना वायरस नागरिकांच्या जिवावर उठला आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना लागण होऊ नये म्हणून पोलीस दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. हे विसरून चालणार नाही. घरात राहा, पोलिसांना सहकार्य करा. या घटनेमुळे सपोउनि राऊत यांच्या कुटुंबीयांवर काय बितत असेल हे शब्दात सांगता येणार नाही.

You may also like

विदर्भ

यवतमाळ जिल्हातील पारवा ठाणेदाराकडून आदिवासी इसमाला जातीवाचक शिवा देत मारहाण

ठाणेदाऱ्यांच्या विरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल यवतमाळ / घाटंजी – तालुक्यातील पारवा पोलीस ...
मुंबई

ऍड. बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही म्हणनार्यांना डेमोक्रॅटिक आरपीआय व सम्यक पँथर चा औकातीत राहण्याचा इशारा.

मुंबई ,  (प्रतिनिधी) – बहुजन हृदयसम्राट ऍड. बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही म्हणनार्यांनी आपल्या ...
मुंबई

महामानवांच्या वंशजांवर अवमानकारक टीकाटिप्पणी सहन केली जाणार नाही – पँथर ऑफ सम्यक योद्धाचा इशारा

मुंबई , (प्रतिनिधी) – कोणत्याही राष्ट्रपुरुष व राष्ट्रमाता तसेच महामानवांच्या वंशजांवर अवमानकारक टीकाटिप्पणी सहन केली ...
मुंबई

सक्ती व बेशिस्त कर्जवसुली थांबवा अन्यथा हातपाय तोडू – पँथर डॉ राजन माकणीकर

मुंबई – कोरोना महामारी संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर वित्तीय संस्थांनी सक्त बेशिस्त दमनकारी कर्जवसुली थांबवावी अन्यथा ...
मुंबई

गोर बंजारा वेशभूषेत मुंबई येथील बहूमजली कारपोरेट कार्यालयाचे उदघाटन सोहळा संपन्न – उदघाटक, गोर पारूबाई जधव

मुंबई –  बंजारा हृदय सम्राट, उद्योगपती, गोर किशनभाऊ राठोड यांच्या संकल्पनेतून प्रथमच ठाणे मुंबई येथील ...
मुंबई

यूपीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून जातीय अत्याचाराच्या घटना थांबवाव्यात – पँथर डॉ राजन माकणीकर

लाखो सह्यांसह मा. राष्ट्रपती यांना शिस्तमंडळ भेटणार मुंबई , (प्रतिनिधी) – भारतात आरएसएस प्रणित भाजप ...