Home मराठवाडा नांदेड विषेशव्रत, कोरोना चाचणीसाठी पाठवलेले १८६ अहवाल प्राप्त

नांदेड विषेशव्रत, कोरोना चाचणीसाठी पाठवलेले १८६ अहवाल प्राप्त

74
0

नांदेड , दि. १२ – ( राजेश भांगे ) – कोरोनाच्या चाचणीसाठी पाठवण्यात आलेल्या १९६ नमुन्या यापैकी १८६ जणांच्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील पाच जणांचे नमुने नकार झाले आहेत आणि पाच नमुन्यांचा तपासणी अहवाल अजून अप्राप्त आहे. नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत ३३२ रुग्णांना क्वारंनटाईन केले होते. यातील ११३ लोकांचा २८ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असून १९१ लोकांना आरोग्य तपासणी करून घरी पाठवण्यात आले आहे, असे आरोग्य विभागामार्फत कळवण्यात आले आहे.

आरोग्यय विभागाच्याय चार टिम व थर्मलगनद्वारे तीन दिवसांच्या कालावधीत ३ हजार ७५५ भाविकांची तपासणी

५ एप्रिल २०२० ते ७ एप्रिल २०२० या तीन दिवसांच्या कालावधीत गुरुद्वारा लांगर साहिब नागिना घाट रोड येथील गुरूद्वारा मधील ३ हजार ७५५ भाविकांची नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या ४ टिमद्वारे थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात आली. तपासलेल्या सर्व भाविकांचे टेंपरेचर साधारण होते त्यांना कसलेही प्रकारचा ताप सर्दी खोकला नव्हता. या भाविकांचे लंगर साहेब येथील हा मोठ्या इमारतीमध्ये वास्तव्य आहे. त्यांना रूममध्ये क्वारन्टाईन मध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत असे वैद्यकीय अधिकारी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड यांनी कळविले आहे.

उपजिल्हा‍ रुग्णाालय, ग्रामीण रुग्णालयात ताप तपासणी केंद्र कार्यान्वित

नांदेड जिल्हा रुग्णालयाच्याा अधिनस्तर सर्व उपजिल्हां रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे जिल्ह्यात १७ ताप तपासणी केंद्र कार्यान्वित करण्याुत आलेले आहेत.
जिल्हा् रुग्णालय नांदेड,उपजिल्हाय रुग्णा्लय, मुखेड, उपजिल्हाा रुग्णा लय, देगलूर, उपजिल्हाा रुग्णा लय, हदगाव, उपजिल्हा रुग्णागलय, गोकुंदा तर ग्रामीण रुग्णाालय भोकर, धर्माबाद, बिलोली, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, बारड, मुदखेड, नायगाव, उमरी जिल्ह्यात १७ ठिकाणी ताप तपासणी केंद्र कार्यान्वित करण्या त आली असल्यालचे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सामान्य रुग्णा‍लय नांदेड यांनी कळविले आहे.

नांदेड जिल्हयातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना विषाणुच्या संक्रमनाच्या बचावासाठी संजीवनी दूत व्हॅन व जीवन बिंदू कक्ष निर्जंतुकीकरण उपकरनाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. श्री. मनोज लोहिया यांचे हस्ते अनावरण.

Unlimited Reseller Hosting