नांदेड – इतवारा येथील पोस्ट ऑफिसचे सर्व पोस्टमन नांदेड येथे गरजू नागरिकांना कोरोना मुळे लोकडाऊन परिस्थितीत नागरिकांनी घराच्या बाहेर येऊ नका..घरांतच बसा आम्ही तुमची काळजी घेऊ असे म्हणत नांदेड डाक टीम नागरिकाच्या दारी आवाज देऊन AEPS द्वारे पैशाचे वाटप करीत असल्याने कोणी डाक विभागाच्या या सेवेचे आभार मानले जात आहे.
तर कोणी आमची सेवा करण्यासाठी साक्षात पांडुरंग येऊन आम्हाला पोस्टमनच्या रुपात आमची सेवा करीत असल्याचे वृद्ध नागरिकांत चर्चा होत असल्याची मोठी चर्चा नांदेड मध्ये एकवण्यास मिळत आहे.
नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी घरा बाहेर येऊ नये आम्ही तुमची सेवा करू तुम्ही प्रशासनास मदत करा असे पोस्टमन मार्फत नागरिकांना अहवान केल्या जात आहे.