Home सोलापुर कै. माजी आमदार बाबासाहेब तानवडे प्रतिष्ठाच्या वतीने १२३३ क्विंटल धान्याचे वाटप.

कै. माजी आमदार बाबासाहेब तानवडे प्रतिष्ठाच्या वतीने १२३३ क्विंटल धान्याचे वाटप.

138
0

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट – वागदरी जि प मतदार संघात कै. बाबासाहेब तानवडे प्रतिष्ठाच्या वतीने जि प सदस्य आनंद तानवडे यांच्या वतीने गरीब व गरजु कुंटंबियांना १२३३ क्विंटल धान्याचे वाटप करण्यात आले.

देशात कोरोनो आजाराने थैमान घातला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या १८ दिवसापासुन जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश आहे. शेतकरी, शेतमंजूर व सर्वसामान्य जनता काम नसल्यामुळे त्रस्त बनले आहे. पोटा पाण्याची प्रश्न बिकट बनला आहे. त्यामुळे समाजातील काही दानशुर व्यक्ती मदतीचे हात पुढे करीत आहेत. वागदरी जि प सदस्य आनंद तानवडे यांनी कै. बाबासाहेब तानवडे प्रतिष्ठाच्या माध्यमातुन २१ गावातील गरीब व गरजु कुंटंबियांना मदतीचे हात पुढे केले आहे. १२३३ क्विंटल धान्याची वाटप केले आहे. यात तांदुळ व गव्हाचे समावेश आहे. वागदरी येथील १२० किट वाटप करण्यात आले आहे.
सध्या ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर बनला आहे. हाताला काम नाही, खर्चाला पैसे नाहीत अशी परिस्थिती आहे. कोरोना भीतीमुळे नागरिक घरातुन बाहेर पडत नाहीत. जमावबंदीचे तंतोतंत पालन करीत आहेत. किराणा दुकान सकाळी ८ ते २ या वेळेतच चालु होत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक वागदरी येथे खरेदीला येत आहेत. प्रत्येक गावात गांव बंदिमुळे नागरिकांना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत आहेत. अशा ही परिस्थितीत तानवडे यांनी प्रत्येक गावात धान्याची वाटप करीत.

Unlimited Reseller Hosting