Home मराठवाडा लॉकडाऊन काळात घराबाहेर पडाल तर कारवाई – सा.पो.नि. –  मल्हार शिवरकर

लॉकडाऊन काळात घराबाहेर पडाल तर कारवाई – सा.पो.नि. –  मल्हार शिवरकर

25
0

नांदेड / किनवट , दि. १० :- कोरोना विषाणू चा पसार होऊ नये यासाठी भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला असून या काळात कोणीही घराबाहेर निघू नये आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असून सुध्दा काहिही काम नसताना काहीजण कामाचा हिला करून घराबाहेर निघत आहेत. जो कोणीही बिनकामाचा घराबाहेर निघाल्यास आपली वाहनाचे जप्ती सह गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा सहायक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांनी दिला आहे.सारखणी परिसरातील नागरिक मात्र या आजाराची गंभीरता न जाणून घेता , बिनधास्तपणे वागताना दिसत आहे. देश लॉकडाऊन असताना आणि संचारबंदी असताना विनाकारण मोकाट फिरणाऱ्या नागरिकांना, वाहन चालकांना धडा शिकवण्यासाठी सिंदखेड पोलीस स्टेशनचे सपोनि मल्हार शिवरकर यांनी कडक कारवाई केल्यामुळे रिकामी टेकड्याना चांगला धसका घेतल्याचे चित्र सारखणी व परिसरात दिसू लागले आहे.स पो निरिक्षकांच्या कारवाईने मोकाट, विनाकारण, दुचाकी आणि चारचाकी वाहन परवाना नसताना मोकाट फिरणाऱ्यावर आणि बिनकामाचा घराबाहेर निघाल्यास आपली वाहनाचे जप्ती सह गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा सहायक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांनी दिली आहे.