नांदेड दि. ११ ( राजेश भांगे ) – जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाच्या संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसून ही जिल्ह्यातील दिलासादायक परिस्थिती आहे. आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या ४८२ आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली ११० असून सध्या निरीक्षणाखाली असलेले ४९ नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये ७ नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले ४२६ अशी संख्या आहे.
आज तपासणीसाठी १७ नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण १९२ नमुने तपासणी झाली आहेत. यापैकी १४५ नमुने निगेटीव्ह आले असून ४२ नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तसेच ५ नमुने नाकारण्यात आली आहेत.
जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी ७० हजार ६२४ असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत. असे आरोग्य विभाग नांदेड यांच्या मार्फत कळविण्यात आले आहे.