Home मराठवाडा आधार कार्ड वर पोस्टमन मार्फत कोणत्याही बँकेतील पैसे काढताना नागरिकांचा मोठा प्रतिसाद

आधार कार्ड वर पोस्टमन मार्फत कोणत्याही बँकेतील पैसे काढताना नागरिकांचा मोठा प्रतिसाद

155

नांदेड , दि.11 :- कोरोना ने देशात थैमान घातल्याने लोकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठया आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

सरकार, संस्था,समाजसेवक, हे अन्नधान्य वाटप करीत आहेत.ग्रामीण भागातून बाहेर गावी बँकेला जाण्यासाठी सर्व मार्ग बंद आहेत. सतत शासकीय सुट्या असल्याने बँका बंद आहेत.आशा परिस्थितीत पैसे नसल्याने नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मोठया संकटाला सामोरे जावे लागत आहे.
भारतीय डाक विभागा तर्फे AEPS म्हणजे आधार लिंक पेमेंट सिस्टीमच्या माध्यमातून इंडिया पोस्ट पेमेंट बँके मार्फत ग्रामीण व शहरातील नागरिकांना जनधन, निराधार,अपंग,अंध लाभार्थी,बँकेचे बचत खाते,गैस अनुदान, जेष्ठ नागरिक पेन्शन, रोजगार हमी योजना लाभार्थी AEPS मार्फत मोठा लाभ घेत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. नांदेडचे डाक अधिक्षक शिवशंकर बी लिंगायत यांनी सांगितले.
नागरिकांनी AEPS आधार लिंक द्वारे पोस्ट ऑफिस किंवा पोस्टमन ला आधार कार्ड दाखवून एका व्यक्तीला रुपये दहा हजार रुपये पर्येंतचे पैसे काडू शकतो.
हे बायोमेट्रिक ने प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पोस्टमन जवळ मिळण्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे.
डाक अधीक्षक शिवशंकर बी लिंगायत यांनी सांगितले की ही सुविधा पहिले पासून सुरू आहे. पण यांचा लाभ लोकडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक घेत आहेत.

बँक खात्याला आधारकार्ड लिंक आसने आवश्यक आहे.

या AEPS द्वारे बँक खाते ग्रहांकानी पोस्टमन मार्फत पैसे उचलून घेऊ शकता.यासाठी ग्रहाकाचे खाते आधार लिंक आसने जरुरी आहे.
ग्रहाकानी पोस्टमन ला आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक देने गरजेचे आहे.
पोस्टमन बायोमेट्रिक सिस्टीम वर ग्रहांचा आंगठा लावला की ताबडतोब एक माहिती अंक क्रमांक मोबाईल वर येतो त्यानंतर पोस्टमन आपल्याला आपल्या गरजे प्रमाणे पैसे सांगितल्यास तो पैसे काडून देतो.
ग्रहाकाचे खाते पोस्टात नसेल तरी यांचा लाभ आपल्याला घेता येतो.
या सुविधासाठी लाभ घेण्यासाठी पैसे आसने गरजेचे नाही. आपले खाते बँकेत आसने गरजेचे आहे व त्या खात्याला आधार लिंक असल्यास याचा लाभ घेऊ शकता.