Home महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नी व मुलीस झाली करोनाची बाधा , उडाली खळबळ

पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नी व मुलीस झाली करोनाची बाधा , उडाली खळबळ

50
0

अमीन शाह

ठाणे जिल्ह्याच्या बदलापूरमध्ये आज ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात पोलिस अधिकाऱ्यांची पत्नी आणि मुलगी यांचा समावेश आहे. दरम्यान मुलीचे वय हे २० वर्षे आहे. देशात लॉकडाऊन असतानाही साताऱ्यात नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेले हे कुटुंब तेथील कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने त्यांना लागण झाली असल्याची माहिती बदलापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे.
तर, बदलापूरात राहणाऱ्या वॉकहार्ट हॉस्पीटलच्या एका कर्मचाऱ्यालाही लागण झाली आहे. या तीनही पॉझिटिव्ह रुग्णांना बदलापूर पालिकेच्या क्वॉरंटाईन सेंटरमद्ये ठेवण्यात आले असून लवकरच त्यांना उल्हासनगरच्या कोव्हीड स्पेशल हॉस्पिटलमध्ये दाखल करम्यात येणार असल्याची माहितीही मुख्याधिकाऱ्यांनी दिली.

Unlimited Reseller Hosting