Home विदर्भ हिवरखेडच्या भूमीपुत्राचा मुंबईहून मदतीचा हात

हिवरखेडच्या भूमीपुत्राचा मुंबईहून मदतीचा हात

11
0

*गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप*

*अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचा उपक्रम*

*दानशूरांनी पुढे येण्याचे आव्हान*

देवानद खिरकर

हिवरखेड प्रतिनिधी /10 एप्रिल:- हिवरखेड येथील विविध प्रभागातील विधवा, परितक्त्या, निराधार अश्या गरजुंना आगामी महात्मा जोतिबा फुले जयंती व डॉ. बाबासाहेब जयंतीचे औचित्त साधून तत्पूर्वी 10 एप्रिल शुक्रवार रोजी जीवनावश्यक साहित्याचे वाटप अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले. यामध्ये मुंबई येथे वास्तव्यास असलेले हिवरखेडचे भूमीपुत्र प्रमोद वानखडे तथा जय अंबे मोबाईल शॉपीचे संचालक संतोष बजाज यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संपूर्ण विश्वात मृत्यूचे थैमान माजविणाऱ्या कोरोना विषाणू मुळे गेल्या 15 दिवसापासून हिवरखेड लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांची दोन वेळा जेवणाची सोय लागणेही अवघड झाले आहे. अश्या विधवा, निराधार, परितक्त्या तथा गरजूंना एक मदतीचा हात म्हणून फुल नाही तर फुलाची पाकळी या प्रमाणाने मुंबई येथे वास्तव्यास असलेले हिवरखेडचे भूमिपुत्र प्रमोद वानखडे, यांनी स्वतःहून मदतीचा हात पुढे करीत मदतीची इच्छा व्यक्त केली त्याला प्रतिसाद देत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना, प्रमोद वानखडे तथा जय अंबे मोबाईल शॉपी यांच्या संयुक्त विद्यमाने तेल, मिरची पावडर, हळद, मीठ, साबण, जिरा, बिस्कीट अश्या जीवनावश्यक वस्तूचा 100 च्या वर नागरिकांना थोड्या प्रमाणात का होईना पण तातडीची मदत म्हणून वाटप करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

*अश्या बिकट समयी दानशूरांनी समोर यावे*
निराधारांना आपापल्या परीने आधार देण्यासाठी येथील दानशूरांनी समोर येऊन मदत करण्याचे आव्हान यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुक दानशूर व्यक्ती अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हिवरखेडच्या पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधू शकतात असे कळविण्यात आले आहे.