Home महत्वाची बातमी करोना बाधित युवकाने गळा कापून घेऊन केली आत्महत्या ,

करोना बाधित युवकाने गळा कापून घेऊन केली आत्महत्या ,

45
0

सर्वत्र उडाली खळबळ ,

अमीन शाह ,

अकोला , येथील सर्वोपचार केंद्रात काल एका करोना बाधित युवकास उपचारार्थ भरती करण्यात आहे होते मात्र आज सकाळी त्याने रुग्णालयात बाथरूम मध्ये स्वतःच्या गळ्यावर धारदार ब्लेड ने वार करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले ,

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार आसाम जिल्हा सालगुडा येथील रहिवासी महोम्मद जहरुल इस्लाम 30 या युवकास करोना वायरस ची बाधा झाल्या मुळे येथील शासकीय वैधकीय रुग्णालयात उपचारार्थ 7 एप्रिल रोजी भरती करण्यात आले होते मात्र आज तो रुग्ण बाथरूम मध्ये रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आला रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर उपचार सुरू केले होते मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला या मुळे अकोला शहेरात एकच खळबळ उडाली आहे , पोलीस घटना स्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे ,

Unlimited Reseller Hosting