Home मराठवाडा अंबड नगरपरिषदेकडून निभावले जात आहे , “सामाजिक दायित्व”

अंबड नगरपरिषदेकडून निभावले जात आहे , “सामाजिक दायित्व”

140

सफाई कामगार ते मुख्याधिकारी यांनी देऊ केला दोन दिवसांचा पगार

अंबड / प्रतिनिधी

जालना – करोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव होऊन,आपला देश या विळख्यात सापडू नये या करिता संपूर्ण देश “लॉक डाऊन”करण्यात आला ,सगळे काही ठप्प करण्यात आले , या बिकट परिस्थितीत काही हाताना काम नाही, या मुळे घरात ध्यान नाही ना खिशात पैसा,आशा लोकांना उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शहरातील स्वछता,पाणी, लाईट या आवश्यक गरजा व्यतिरिक्त ही आपन अजूनही समाजाचे काही देणं लागतो म्हणून नगर पालिकेच्या,सफाई कामगार ते मुख्याधिकारी यांनी आपले दोन महिन्याचे वेतन कोरोना मुळे अडचणीत आलेल्या ना देऊन आपले सामाजिक दायित्व दाखवले आहे.
यात जमा झालेल्या २ लाख रूपया पैकी करोना साठी असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीस तर १ लाख रुपयांचे गरजूंना घरपोच किराणा सामानाचे २०० किट शहरातील एकलव्य नगर ,शिंदे नगर, देशमुख नगर, या वस्तीत वाटप करण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या या काळात शहरातील कोणत्याही कुटूंबावर उपाशी राहण्याची येऊ नये म्हणून नगर पालिकेने केलेल्या सर्वेक्षण नुसार २२०० कुटुंब गरजवंत असून अशा प्रत्येक कुटूंबाना हे किट वाटप करण्याचा मानस असून हा उपक्रम शहरातील दानशूर व्यक्तीच्या दानातून राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.अंबड नगरपरिषद ने केलेल्या उपासमार होणाऱ्या नागरिकांचे सर्व्हे नुसार गरजवंत याना घरपोच अन्नधान्य किराणा किट वाटपाचे महत्वाचे काम महिला बचतगट विभागाचे समुदाय संघटक “शरद मगर” आणि त्यांचे सोबत सर्व सफाई कर्मचारी जबाबदारीने पार पाडत आहेत. सर्वांच्या नोंदी ठेवल्या जात आहेत. मुख्याधिकारी डॉ. सागर घोलप जीवन जगत असतांना प्रत्येक व्यक्तीला कोणाची ना कोणाची मदत लागते ,कधी कोणावर काय प्रसंग येईल हे सांगता येत नाही अशा कठीण प्रसंगी कामी येणे हेच आपले समाजा प्रति दायित्व आहे.आज माणसावर आलेल्या या संकटात कुणीही उपाशी राहू नये हाच यामागचा उदेश आहे.
अंबड नगर पालिका मुख्याधिकारी डॉ. सागर घोलप