Home उत्तर महाराष्ट्र कोरोनामुळे बळीराजावर आर्थिक संकट.. साखर कारखान्यांनी तात्काळ ऊस बिलाचा दुसरा हप्ता द्यावा-...

कोरोनामुळे बळीराजावर आर्थिक संकट.. साखर कारखान्यांनी तात्काळ ऊस बिलाचा दुसरा हप्ता द्यावा- शंभुसेना

34
0

पिक कर्ज वाटप करण्याची मागणी..

अ.नगर (प्रतिनिधी) – कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने सध्या कडक लॉकडाऊन सह संचारबंदी लागू केल्यामुळे राज्यातील सर्वच शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला असल्यामुळे साखर कारखान्यांनी एफआरपी नुसार ऊस बिलाची रक्कम तात्काळ अदा करावी त्याचबरोबर दिवाळीत दिला जाणारा ऊस बिलाचा दुसरा हप्ता लवकरात लवकर द्यावा तसेच सरकारने तात्काळ पीक कर्ज वाटप करून सामान्य शेतकरी वर्गाला आर्थिक संकटातून बाहेर काढावे असे कळकळीचे आवाहन शंभुसेना संघटना प्रमुख मा.दिपकराजे शिर्के यांनी केले आहे.

राज्यासह जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात दुष्काळ, महापूर आणि अतिवृष्टीमुळे आगोदरच शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असताना त्यात सरकारने अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची आर्थिक मदत कित्येक शेतकऱ्यांना दिलीच नाही तोच, यावर्षी ऊस उत्पादन कमी झाल्याने साखर कारखानेही महिनाभर उशिराने सुरू झाले होते. जवळपास 25 ते 30 टक्के ऊस लागवड कमी झाल्याने साखर उत्पादनही यंदा घटल्याचे दिसत आहे.

“दुष्काळात तेरावा महिना” या म्हणीप्रमाणे मागील अनेक दिवसांपासून “कोरोना’ रोगाचे सर्वत्र सावट पसरले आहे. त्याचा सर्वात जास्त आर्थिक फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. काही साखर कारखान्यांनी जानेवारी नंतर फेब्रुवारी महिन्यात गाळप झालेल्या ऊसाची बिले अद्याप दिली नाहीत, म्हणून संबंधित जबाबदार साखर कारखान्यांनी लवकर लवकर बिले काढावीत व याकामी सरकारने आदेश द्यावेत तसेच प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागानेही लक्ष द्यावे अशी मागणी शंभुसेना संघटनेचे प्रमुख राजेशिर्के यांनी केली आहे.

ऊस नियंत्रण आदेश 1966 च्या कलम 3 (3) मधील तरतुदीनुसार हंगामात गाळप केलेल्या ऊसबिलाची रक्कम 14 दिवसात शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. वेळेत एफआरपी ची रक्कम न दिल्यास कलम 3(3ए) नुसार विलंब कालावधीसाठी 15 टक्के व्याज आकारण्याची तरतूद आहे. तरी ऊस उत्पादकांना दिलासा द्यावा व लवकरात लवकर पीक कर्ज वाटप सुरू करावे अशी मागणीही शेतकऱ्यांकडून होत आहे. “कोरोना’ मुळे 14 एप्रिलपर्यंत लॉक डाऊन करण्यात आले आहे. तसेच संचारबंदी देखील आहे. अशा परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक गरज लक्षात घेऊन सरकारने ठोस पावले उचलावीत असे कळकळीचे आवाहन शंभुसेना संघटनेने केले आहे.

Unlimited Reseller Hosting