Home महत्वाची बातमी सामान्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंतिम दर्शन घेण्याचा सल्ला देणारे व्हीआयपी वाधवानांना मोकळीक

सामान्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंतिम दर्शन घेण्याचा सल्ला देणारे व्हीआयपी वाधवानांना मोकळीक

179

सुरेश वाघमारे

मुंबई – महाराष्ट्र सरकार आणि पोलीस ज्यांच्या घरात मृत्यू झाला आहे किंवा कौटुंबिक सदस्य सिरियस आहेत अश्या लोकांना पोलीस परवानगी देत नाही उलट सल्ला देत आहे की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंतिम दर्शन घ्या. सामान्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंतिम दर्शन घेण्याचा सल्ला देणारे व्हीआयपी वाधवानांना मोकळीक देत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.
सामन्यांना एक न्याय आणि असामान्यांना व व्हीआयपी यांना वेगळा न्याय, ही बाब चुकीची असून ज्यांना खरेच गरज आहे अश्यांना परवानगी देण्याची गरज असल्याचे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे. गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता सारखे अधिकारी पदाचा दुरुपयोग करत असून यामुळे सरकार आणि पोलीस प्रशासन कोणासाठी काम करत आहे, ही बाब सिद्ध झाली आहे. अनिल गलगली यांनी गुप्ता यांचे पत्र जारी करण्यापूर्वी आणि नंतरच्या 2 दिवसांच्या मोबाइल संभाषणाची तपासणी करण्याची मागणी केली जेणेकरुन सत्यस्थिती बाहेर येईल.