महत्वाची बातमी

धर्माबाद पोलिसांची मोठी धाड, ४ लाख ५९ हजार रुपयांचा पानमसाल जप्त

Advertisements

नांदेड , दि. ९ ( राजेश भांगे ) – धर्माबाद, सुभाषरोड येथील रविकुमार कोंडावर, राजकुमार कोंडावर या व्यक्तींच्या ताब्यातील विविध १२ ब्रॉन्डचा किंमत ४ लाख ५९ हजार १९० रुपयांचा पानमसाला व सुंगधीत तंबाखु जप्त करुन दोन्ही व्यक्ती विरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा अंतर्गत व बादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धर्माबाद पोलिसांनी गुप्त माहितीवरुन धर्माबाद बाळापूर रोड येथील मे. राजराजेश्वर किराणा दुकान येथे धाड टाकून प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा साठा जप्त केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास दिली होती. त्या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी श्री जिंतुरकर यांनी ८ एप्रिल रोजी धर्माबाद पोलिसांनी ताब्यात दिलेल्या या दोन्ही व्यक्तींवर कार्यवाही केली असुन ही कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी श्री. जिंतुरकर व नमुना सहाय्यक अमरसिंग राठोड यांनी सहायक आयुक्त (अन्न) श्री. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

You may also like

महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...
महत्वाची बातमी

जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या तक्रारीची दखल

सोलापूर  – सोलापूर येथील सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या मुख्य वसुली अधिकारीने दै . अब तक सोलापूरचे ...