Home मराठवाडा करोना मूळे गरिबांचे हाल तर धान्य दुकानदार ही करीत आहे गरिबांचे आर्थिक...

करोना मूळे गरिबांचे हाल तर धान्य दुकानदार ही करीत आहे गरिबांचे आर्थिक व मानसिक शोषण ,

19
0

प्रशासनाचे दुर्लक्ष ,

सय्यद नजाकत ,

बदनापूर/प्रतिनिधी

सध्या कोरोना रोगामुळे गोर गरिबांचे अतोनात हाल होत असून हाताला काम नसल्यामुळे पैस्याची वचणचण भासत आहे,जीवनावश्यक वस्तू विक्री करणारे किराणा दुकानदार जास्त दराने विक्री करीत असल्याने गोर गरीब वैतागलेले असतांना शहरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक चार मध्ये अचानक स्वस्त धान्य वाटप सुरू झाल्याने ग्राहकांनी तोबा गर्दी केली असून दुकानावर पोलीस बंदोबस्तात स्वस्त धान्य वाटप करावे लागत आहे

कोरोना प्रदुभाव रोखण्यासाठी शासनाने लॉक डाऊन करून नागरिकांना घराबाहेत न निघण्याचे आदेश दिलेले आहे त्यामुळे दररोज कामकाज करून मिळणाऱ्या पैस्यातून कुटुंबाची उपजीविका भागविणाऱ्या गोर गरिबांचे हाल होत आहे त्यातच अत्यावश्यक सेवेमध्ये जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानदारांना मुभा देण्यात आल्याने बदनापूर शहरातील काही किराणा दुकानदारांनी अन्न धान्याचे भाव आकाशाला भिडविले असल्यामुळे गोर गरीब अडचणीत आले त्यातच शासनाने गोर गरिबांना अल्पदरात अन्न धान्य देण्यासाठी स्वस्त धान्य दुकाने सुरू केलेली आहे मात्र शहरातील स्वस्त धान्य दुकानदार देखील अवाच्या सव्वा भाव घेत असल्याने आणि पुरवठा विभाग मूग गिळून बसल्याने गरिबांचा वाली कोणी राहिलेला नाही

दरम्यान बदनापूर शहरातील पाच स्वस्त धान्य दुकाने असून 9 एप्रिल रोजी शंकरनागर भागातील दुकान क्रमांक चार मध्ये स्वस्त धान्य वाटप सुरू झाल्याची माहिती या भागातील राशन कार्ड धारकांना मिळाली असता या कार्ड धारकांनी तोबा गर्दी केली यामध्ये लॉक डाऊन चे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे चित्र दिसून आले ,या दुकानाला 428 कार्ड जोडण्यात आलेले असून कार्ड धारकाचा हाताचा ठसा घेऊन धान्य वाटप केले जात आहे तर शहरातील इतर दुकानदारांनी पावत्या न दिल्याने या भागातील नागरिकांनी थेट स्वस्त धान्य दुकानदारस पावती द्या नसता पैसे देणार नाही अशी भूमिका घेतल्याने नाईलाजास्तव पावत्या देणे भाग पडले

एकंदरीत या ठिकाणी तोबा गर्दी झाल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले व पोलीस बंदोबस्तात स्वस्त धान्य वाटप करावे लागले,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख इब्राहिम हे स्वतः पोलीस निरीक्षक एम बी खेडकर यांच्या आदेशाने बंदोबस्त कमी हजर होते,यावेळी दुकानदाराने काहींना पावत्या दिल्या मात्र काहींना दिल्या नसल्याच्या तक्रारी ग्राहक करीत होते, मी शासन दराने सर्वांना अन्न धान्य वाटप करीत असून नागरिकांनी गर्दी न करता सेल्फ डिस्टन्स मध्ये अन्न धान्य रीतसर मालाची पावती घेऊन घेऊन जावे असे आव्हान धान्य दुकानदार आसेफ पठाण यांनी केले
******
शंकरनगर भागातील नागरिक अकिल पठाण व बाबासाहेब चोरमारे यांनी सांगितले की सदर स्वस्त धान्य दुकानदार शासन दराने धान्य वाटप करीत नाही,व नियमानुसार धान्य दिले जात नाही तसेच पावती मागितल्यास अरेरावी करतो व राशन देणार नाही अशी धमकी देतो परंतु पुरवठा विभाग जाणीवपूर्वक दृलक्ष करीत आहे

Unlimited Reseller Hosting