Home मराठवाडा किनवट येथे रक्तदान करून तहसिलदार नरेंद्र देशमुख यांनी केलं रक्तदान शिबीराचं उद्घाटन.

किनवट येथे रक्तदान करून तहसिलदार नरेंद्र देशमुख यांनी केलं रक्तदान शिबीराचं उद्घाटन.

137

मजहर शेख

नांदेड / किनवट दि. ०९ :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील सरस्वती विद्या मंदीर शाळा व महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद किनवट व माहूर तालुका शाखेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी स्वतः रक्तदान करून केले.
यावेळी आमदार भीमराव केराम, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष अजय चाडावार, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, गट विकास अधिकारी सुभाष धनवे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, पोलिस निरीक्षक मारोती थोरात, म. रा.शि. प. मुंबईचे राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, दिनकर चाडावार, शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड, केंद्र प्रमुख रमेश राठोड, सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे संगमेश्वर नळगिरे, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, नगरसेवक शिवा आंधळे, गिरीश नेम्माणीवार, गोवर्धन मुंडे, अनिरूध्द केंद्रे आदि प्रमुख अतिथी उपस्थित होते.
आयोजक जिल्हा कार्याध्यक्ष नरसिंग यंड्रलवार यांनी प्रास्ताविक व अमोल उत्तरवार यांनी सूत्रसंचालन केले. रवि नेम्माणीवार यांनी आभार मानले. स्वागताचा कोणताही सोपस्कार न करता दीप प्रज्वलन करून शिबीरास प्रारंभ झाला. त्यानंतर शंभर दात्यांनी रक्तदान केले.
याप्रसंगी संतोष दासरवार, गजानन निळकंठवार, शिवराज मुंडे, सचिन चव्हाण, गोपाल कनाके, समशेर खान, रमेश आंधळे, करण एंड्रलवार, सुरेश माडपेल्लीवार, साई नेम्माणीवार, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
शिबीराच्या यशस्वीतेसाठी रविंद्र चौधरी, सदानंद अचुकलवार, संतोष पेटकुले, अविनाश दासरवार, विकास राठोड, गिरीश पत्की, प्रशांत कोरडवार, योगेश वैद्य, विवेक पेगर्लावार, सचिन कोंडापुलकलवार, ज्योतीबा बनसोडे, देवराव यंड्रलवार, चंद्रकांत नेम्माणीवार आदिंनी परिश्रम घेतले.