Home जळगाव जमात-ए-इस्लामी हिंद, जळगावकडून ४५८ रेशनिंग किट्स गरजूंना वाटप

जमात-ए-इस्लामी हिंद, जळगावकडून ४५८ रेशनिंग किट्स गरजूंना वाटप

202

रावेर (शरीफ शेख)

जळगाव : संपूर्ण विश्वात थैमान माजणाऱ्या कोरोना विषाणू मुळे होणाऱ्या संसर्गाला कमी करण्यासाठी आणि कोरोना विरुद्ध लढाई जिंकण्यासाठी भारत साकार कडून उपाययोजना म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन (ताळेबंद) मुळे कित्येक रोजंदारीने काम करणारे मजूर आणि त्यांच्यावर निर्भर असणारे कित्येक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे अश्यात पूर्ण राज्यात विविध सेवाभावी संसाथांमार्फात अश्या भुकेल्या, गरीब, आणि गरजूंपर्यंत महिन्याभराची रेशन आणि शिजलेले जेवण पोहचविण्याचे सद्कार्य सुरु आहे. कोरोनाच्या ह्या लढाईत पोलीस,डॉक्टर्स आणि प्रशासनाबरोबर ह्या सेवाभावी संस्थांचेही मोलाचे योगदान नाकारता येणार नाही. यांत जमात-ए-इस्लामी हिंद संकटाच्या वेळी नेहमी समाजकार्यचे करण्यात सदैव तत्पर आणि प्राथमीकतेने सहभागी होत असते. जमात-ए-इस्लामी हिंद च्या जळगाव शाखेतर्फे आतापर्यंत ४५८ रेशनिंग किट्स गरजूंना वाटप करण्यात आले तसेच ९५ विविध लोकांना नगदी मदत देण्यात आली, असे एकूण ३६५६००/- (तीन लाख पासष्ठ हजार सहाशे रु.) ची मदत आतापर्यंत करण्यात आलेली आहे आणि हा दानकार्य अजून सुरूच आहे. दान केलेल्या प्रत्येक कीट मध्ये तांदूळ, तुरडाळ, तेल, चहा,साखर, मिरची पाउडर आणि गव्हाचे पीठ आहे. जमात -ए- इस्लामी हिंद जळगाव बरोबर एस.आई.ओ.जळगाव, एम.पी.जे. जळगाव, तसेच खिदमत-ए-खल्क़ फौंडेशन, आणि अमन फौंडेशन जळगाव ह्या संस्थानांचेही मोलाचे योगदान लाभले. ह्या पुण्यकार्यात आपल्या देणग्या देणाऱ्यांचे दान-देणगी अल्लाह कडे कुबूल होवो अशी दुआ आहे.