Home सोलापुर सेवानिवृत कर्मचारी संगणप्पा वाले यांच्या कडून गरिबांना किराणा माल वाटप.

सेवानिवृत कर्मचारी संगणप्पा वाले यांच्या कडून गरिबांना किराणा माल वाटप.

287

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट – संपूर्ण देशभर कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान व मुख्यमंत्री च्या आवाहनाला प्रतिसाद देत वागदरी सेवानिवृत सेवानिवृत प्राचार्य संगाणप्पा वाले, यानी वागदरी येथील गरिब व गरजुना किराणा माल वाटप करण्यात आले. तर वाढदिवसा निमित्ताने पंतप्रधान साहाय्यता निधी व मुख्यमंत्री साहाय्यता निधीस प्रत्येकी 5000 हजार रुपये असे एकूण दहा हजार रुपये देऊन वेगळाच पद्धतीने वाढदिवस साजरा केला आहे.

सध्या कोविड १९ विषाणूचा हाहाकार सर्वञ झाला आहे.जनजीवन टप्प आहे.केंद्र व राज्य सरकार अनेक उपाययोजना करत आहे.त्या साठी देशातील जनतेला मदत करण्याचे आवाहन पंतप्रधान व मुख्यमंत्री केले आहे .त्याप्रमाणे प्रत्येक जण आपल्या परीने मदत करत आहेत.वागदरी येथील जेष्ठ नागरिक व अक्कलकोट आयटीआय चे माजी प्राचार्य सेवानिवृत कर्मचारी संगणप्पा वाले सरांनी सुद्धा पंतप्रधान साहाय्यता निधीस पाच हजार व मुख्यमंत्री साहाय्यता निधीस पाच हजार रुपये चेक वागदरी येथील बँक आँफ इंडिया च्या शाखेत जमा केले.वागदरी बँकेचे मँनेजर निलेश सोनवणे यांच्या कडे धनादेश दिले.यावेळी कँशिअर रितेष पवनीकर,कर्मचारी अंकुश सांवत व पोलिस कर्मचारी मल्लिनाथ बंदिछोडे, ग्रा प सदस्य सुनिल सावंत, संतोष पोमाजी, विरभद्र पुरंत, महानिगप्पा कलबुर्गी आदी उपस्थित होते.

सध्या देश संकटात आहे.अशावेळी एक नागरिक म्हणून प्रत्येकाने धावून येण्याची गरज आहे.या भावनेतून मी छोटीशी आर्थिक मदत केले आहे .अशी भावना यावेळी व्यक्त केली
संगणप्पा वाले सेवानिवृत कर्मचारी