Home मराठवाडा मांडवी पोलिसांची धडक कार्यवाही,24,372 रूपयांचा दारू सह तिन लाखाची कार जप्त.

मांडवी पोलिसांची धडक कार्यवाही,24,372 रूपयांचा दारू सह तिन लाखाची कार जप्त.

54
0

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि. ०९ :- कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती प्रतिबंध उपाययोजनासाठी गसत घालीत असताना मांडवी पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष केंद्रे ,पो हे. प्रकाश असवले यांनी तिन ठिकाणी धाड टाकून 24372 रूपयांचा दारू सह तिन लाखाची कार जप्त केली आहे.

सर्वत्र कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढत असल्याने दि.7 मंगळवारी रोजी जनजागृती व उपाययोजना करण्यासाठी मांडवी पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष केंद्रे ,पो हे. प्रकाश असवले हे गसतीवर असताना जावरला या गावी सुभाष कयापाक हे आपल्या शेतात 450 लिटर मोहफुलाची रसायन मिश्रण दारू तयार करून विक्री करण्याच्या हेतूने दिसून आला.जवळपास 22 हजार 500 रूपयांची दारू जप्त करून आरोपी विरूध्द गुन्हा नोंदवला आहे.
तसेच तेलगांना सिमेवरून मोठया प्रमाणावर अवैध दारू ची वाहतुक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून सपोनि संतोष केंद्रे. पोलिस उपनिरीक्षक शिवप्रसाद कराळे, पोलिस कर्मचारी चव्हाण, होमगारड जाधव, श्रीमनवार यांनी अवैध रित्या दारू बाळगणारे कलमदास गंगाराम वेटी व अर्जुन आनंदराव कनाके रा नागापुर यांच्या कडून 6 देशी दारू बाॅटल किंमत 312 रुपयांचा माल जप्त करून गुन्हा दाखल केला. त्याप्रमाणे तेलगांना राज्यातून करंजी या गावाकडून लाल रंगाची कार न. टि. एस. 07 इ.एल.1001 ची नागापुर येत असतांना झडती घेतली असता बिअर च्या 12 बाॅटल आढळून आल्या त्यांची किंमत 1560 रूपये एवढी असून 3 लाख रुपयांच्या कार जप्त करून आरोपी वमशैरेडी राजारेडी रा करंजी मंडळ भिमपूर जि.आदिलाबाद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.