Home विदर्भ यवतमाळ शहरातील गुलमोहर पार्क आणि मोमीनपुरा पूर्णपणे शटडाऊन

यवतमाळ शहरातील गुलमोहर पार्क आणि मोमीनपुरा पूर्णपणे शटडाऊन

56
0

65 पैकी 59 जणांचे रिपोर्ट प्राप्त , 6 जणांचे अप्राप्त…!

यवतमाळ, दि.9 : आयसोलेशन कक्षात भरती असलेल्या व निजामुद्दीन लिंक असलेल्या तबलिगी समाजाच्या नागरिकांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. धर्मिक संमलेनाशी संबंधित सात तबलिगी नागरिकांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले असून हे सर्व नागरिक बाहेरच्या राज्यातील आहे. तर यांच्या संपर्कात आल्यामुळे यवतमाळ येथील एका नागरिकाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला आहे. आयसोलेशन कक्षात भरती असलेल्या 65 नागरिकांपैकी आता 59 नागरिकांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून उर्वरीत 6 नागरिकांचे रिपोर्ट गुरवारी प्राप्त होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

यवतमाळ येथील पॉझेटिव्ह आलेल्या नागरिकाचे वास्तव्य असलेला शहरातील गुलमोहर पार्क आणि मोमीनपुरा भाग प्रशासनाने पूर्णपणे शटडाऊन केला आहे. येथील सर्व दुकाने, संपूर्ण परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला असून त्यासाठी पोलिस विभागाला पुढील आदेश होईपर्यंत 500 होमगार्डची मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या भागात आरोग्य विभागाच्या 50 टिममार्फत प्रत्येक घराची तपासणी गुरुवारी सकाळी 6 वाजतापासून करण्यात येणार आहे. यासाठी एक उपविभगीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक आणि आरोग्य अधिकारी यांच्यासोबत आरोग्य विभागाच्या प्रत्येकी 25 टीम राहणार आहे. आरोग्य विभागाच्या या प्रत्येक टीममध्ये चार लोकांचा समावेश आहे.

पहिल्या टीमकरीता यवतमाळचे उपविभागीय अधिकारी आणि आर्णिचे तहसीलदार तसेच वर नमुद सर्व अधिकारी तर दुस-या टिमकरीता दारव्हाचे उपविभागीय अधिकारी आणि बाभुळगावचे तहसीलदार राहणार आहेत. गुरवारी सकाळी 6 वाजतापासून हा सर्वे सुरू होणार असून तो ‘डोअर टू डोअर’ केला जाईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.