Home मराठवाडा नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते गरजू नागरिकांना अन्नधान्याचे...

नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते गरजू नागरिकांना अन्नधान्याचे वाटप.

217

नांदेड , दि. ०९ – ( बालाजी सिलमवार ) – कॊरोना वायरसच्या लॉकडाऊनमुळे मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथील काही मजूर सध्या हाताला काम नसल्यामुळे तेलंगणा राज्यात मिरची तोडायला गेले अडकून पडल्यामुळे त्याची छोटी मुले व वृद्ध माणसांची उपासमार होत असल्याची बाब नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.मंगाराणिताई अंबुलगेकर यांना कळताच त्यांनी तात्काळ या बाबीची दखल घेत बाऱ्हाळी परिसरात जाऊन त्या मजुरांना जीवनावश्यक वस्तू गहू,तांदूळ,तेल,इतर धान्य त्यांची वाटप करून या परिस्थितीत माणूसकीचे दर्शन घडविले आहे.

कोराना विषाणामुळे अनेकांच्या हाताला असणारे काम बंद झाले त्यामुळे अनेक गोर गरीबांच्या चुली बंद झाल्या. काय करावे कळेना ? दोन वेळेसचे जेवण बनविण्यासाठी सुध्दा घरातील डब्यात धान्य नाही.व आजाराची धास्ती अनेकांनी घेतल्याने त्या भयभीत लोकांना धिर देऊन त्याच्या अडचणी समजून घेण्यात आल्या.व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ अंबुलगेकर मॅडम यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी सोबतच जिल्हातील जवळपास सर्वच गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना कोरोना या आजाराविषयी योग्य त्या सूचना करून त्या त्या तालुक्यातील परिस्थितीची माहिती घेतल्याचे कळते.सोबतच आरोग्य खात्यातील चांगले काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचे व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, व गावपातळीवर जीव ओतून काम आरोग्य सेवक,ग्रामसेवक,शिपाई यांच्याही कार्याचे कौतुक केले व कामात हयगय करणाऱ्या कामचुकार अधिकारी कर्मचारी यांचे मात्र गय केली जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून म्हटले आहे.तसेच ग्रामसेवक संघटनेच्या चौदाव्या वित्त आयोगातून कोरोना आजारावर प्रतिबंधात्मक उपायविषयी व इतरच्या मागणी बाबत मी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मा.अशोकराव चव्हाण साहेबाच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्रीकडे पाठपुरावा करणार असल्याची यावेळी त्यांनी ग्वाही दिली.यावेळी सौ अंबुलगेकर म्हणाल्या की जिल्ह्यातील जनतेनी भयभीत न होता कुणीही घराबाहेर न पडता शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे तसेच अत्यावश्यक बाबीसाठी घराबाहेर जाण्यासाठी गरजच पडली तर सुरक्षित अंतर राखून आपले व्यवहार करावे असेही आवाहन त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे. यावेळी त्यांच्या समवेत सुरेशराव अंबुलगेकर,अनिता कांबळे यांच्यासह अनेकाची उपस्थिती होते.