Home महाराष्ट्र अमळनेरजवळ अन्नदान करण्यासाठी गेलेली रिक्षा उलटून दोन युवक ठार तर तीन जण...

अमळनेरजवळ अन्नदान करण्यासाठी गेलेली रिक्षा उलटून दोन युवक ठार तर तीन जण गंभीर जखमी

115
0

जीवन महाजन

अमळनेर

शहरात सध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. या अनुषंगाने गरिबांना अन्नदान करायला गेलेल्या तरुणांची रिक्षा उलटून दोन तरुण जागीच ठार व तीन जण
जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असून दोन जण जखमी आहेत.
ही घटना आज दि ८ रोजी सायंकाळी
साडेसातच्या सुमारास झाडी गावाजवळ घडली. ऋषिकेश उमेश शेटे (२०) व विशाल दिनेश पाटकरी (१८) अशी मयत तरुणांची नावे
आहेत.
शहरातील शिरूड नाका येथील सात-आठ तरुण
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात गरिबांना अन्नदान करायला झाडी व मुडी गावाला गेले. मुडी येथून परतत असताना झाडी
गावाजवळ त्यांची रिक्षा पलटली. त्यात ऋषीकेश उमेश शेटे, विशाल दिनेश पाटकरी हे दोघे जागीच ठार झाले आहेत.

यातील जयेश रमेश पाटील हा गंभीर जखमी झाल्याने त्याला धुळे येथील
जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले, तर अक्षय नंदकुमार महाजन व चेतन राजेंद्र चौधरी हे किरकोळ जखमी आहेत.
जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रकाश ताळे यांनी जखमींवर औषधोपचार केले.

मारवड पोलीस स्टेशनचे एपीआय राहुल फुला, एएसआय रोहिदास जाधव, हेडकॉन्स्टेबल भास्कर चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन पंचनामा केला.