Home विदर्भ अडेगाव येथे स्वस्त धान्यं दुकानात ग्राहकांना मोफत तांदुळाचे वाटप.!

अडेगाव येथे स्वस्त धान्यं दुकानात ग्राहकांना मोफत तांदुळाचे वाटप.!

26
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील अडेगाव येथे प्रधानमंञी गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत तांदुळाचे वाटप येथील स्वस्त दुकानात आज आठ एप्रिल रोजी सकाळी करण्यात आले. कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती असल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार राशन कार्डावर असलेल्या नावानुसार प्रति व्यक्ति पाच किलो प्रमाणे तादूळाचे वाटप करण्यात आले.
या योजनेचा शुभारंभ अडेगाव येथील आपत्कालीन समितीच्या वतीने करण्यात आले.
यावेळी दुकाना समोर सॅनीटायझर व साबणाने ग्राहकांना हात धुन्याकरिता साबणाची व्यवस्था करण्यात आली होती. नियमानुसार
शोशल डिस्टन्स ठेवून ग्राहकांना उभे करण्यात आले होते.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दशरथ भुजाडे यांनी ग्राहकांना मास्कचे वाटप करून शोशल डिस्टन्स ठेवून धान्य उचलण्याचे आवाहन केले.स्वस्त धान्य दुकान चालक श्रीकांत ठाकरे यांनी पाञ लाभांर्थ्याना टोकण वाटून तांदुळाचे वाटप केले. यावेळी आठशेच्या पुढे लाभारथ्याना धान्य वाटण्यात येणार असल्याचे सागितले.
ग्राहकांना व्यवस्थित धान्ये पोहचण्याकरीता सरपंच दुर्गाबाई कांबळे,उपसरपंच अनिल वानखेडे, सचिव नलिणी नितोने,ग्रामपंचायत सदस्य अनिता कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक सराटे, सामाजिक कार्यकर्ते , दशरथ भुजाडे, कैलास कांबळे,माणीक इंगळे व आपत्कालीन समितीच्या सदस्यांनी शोशल डिस्टन्स ठेवून सहकार्य केले.

Unlimited Reseller Hosting