Home मराठवाडा रक्षकांच्या रक्षणासाठी ३०० लिटर्स सॅनिटाझर ; पोलीस अधिक्षक घेतायेत आपल्या दलातील प्रत्येकाची...

रक्षकांच्या रक्षणासाठी ३०० लिटर्स सॅनिटाझर ; पोलीस अधिक्षक घेतायेत आपल्या दलातील प्रत्येकाची काळजी

125
0

नांदेड, दि. ०८ ( राजेश भांगे ) – कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी लॉकडाऊन आणि त्यापाठोपाठ उद्भवलेल्या परिस्थितीत रुग्णालयात डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि रस्त्यावर पोलीस कर्मचारी सदैव जागरुकतेने आणि जीव जोखमीत घालून आपले रक्षण करत आहेत. या रक्षकांचेही कोविड १९ या कोरोना विषाणूपासून रक्षण करता यावे.

यासाठी पोलीस दलाचे पालक म्हणून नांदेड पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर हे आपल्या दलातील प्रत्येकाची काळजी घेत आहेत. त्यासाठी सॅनिटायझर वाटप करण्यात येत आहे. भोकर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अंतर्गत कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी ३०० लिटर सॅनटायझर वाटप करण्यात आले आहे.

सध्या कोरोनाच्या प्रतिबंध व्हावा म्हणून नागरिकांसाठी पोलिस दल मदतीला आपल्या जीवाची पर्वा न करता हे पोलीस रोज रस्त्यावर आपल्यासाठी तत्पर आहेत. खाकी वर्दीतला अधिकारी किंवा कर्मचारी हा देखील माणूसच आहे. त्यासाठी पोलीसांच्या आरोग्याची काळजीही आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे.

कोरोनाच्या आपत्ती सोबत दोन हात करताना सॅनिटायजर लावलेले हात हे देखील महत्त्वाचे ठरत आहेत. यामुळे भोकर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अंतर्गत कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी ३०० लिटर सॅनिटायझर वाटप केलेले आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय, पोलीस स्टेशन मोटार व परिवहन विभाग यांच्या विविध शाखा व कार्यालय परिसरात जंतुनाशक फवारणीसाठी पंप वाटप केले आहेत. या पंपाद्वारे फवारणी करण्यात येत असून कार्यालयाचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलीसांना हँडवाश वाटप केले, कोरोनाच्या संक्रमण पासून बचाव करण्यासाठी पोलिसांना मास्क, चष्मे इ. साहित्य देण्यात आले, त्याचप्रमाणे स्वच्छतेसाठी लागणाऱ्या विविध साहित्याचा पुरवठा देखील करण्यात आला आहे. कर्तव्यावर असणाऱ्या नांदेड शहरातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्य ठिकाणावर जेवण पोहोचविले जात आहे. आपल्या दलाच्या जवानांच्या आरोग्याची व सुरक्षेची काळजी घेण्यासाठी नांदेड पोलिस दल सेवेस तत्पर आहे असंच म्हणता येईल.

Previous articleकोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हानांनी घेतली देगलूर येथे बैठक
Next articleमाणिकगड सिमेंट कंपनीच्या वतीने गरजूंना ८०० धान्य कीटचे वाटप
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here