Home विदर्भ माणिकगड सिमेंट कंपनीच्या वतीने गरजूंना ८०० धान्य कीटचे वाटप

माणिकगड सिमेंट कंपनीच्या वतीने गरजूंना ८०० धान्य कीटचे वाटप

112
0

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते वाटपाला प्रारंभ

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे

गडचांदुरातील गरीब गरजूंना माणिकगड सिमेंट कंपनीच्या वतीने ८०० धान्य कीटचे वाटप करण्यात येणार आहे. गडचांदूर नगर परिषदेच्या सभागृहात आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते वाटपाला प्रारंभ करण्यात आला.
गडचांदूर हे औद्योगिक शहर असून याठिकाणी परराज्यातून आलेले अनेक मजूर आहेत. तसेच अनेक गरीब कुटुंबांकडे राशन कार्ड नाही. संचार बंदीमुळे त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमदार सुभाष धोटे यांनी गडचांदुरातील गरजूंना माणिकगड सिमेंट कंपनीच्या वतीने धान्याचा पुरवठा झाल्यास येथील समस्या जिथल्या तिथे संपविता येईल यासाठी जिल्हाधिकारी कुणाल खेमनार व माणिकगड सिमेंट कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र काब्रा यांच्याशी संपर्क साधून समन्वय घडवून आणला.
यावेळी नगराध्यक्षा सविता टेकाम, उपनगराध्यक्ष शरद जोगी, अरूण निमजे, तहसिलदार महेंद्र वाकलेकर, मुख्याधिकारी विशाखा शेळकी, ठाणेदार गोपाल भारती, माणिकगड सिमेंटचे उपाध्यक्ष (मानव संसाधन) देवेंद्र सिंग, रत्नाकर राऊत, विठ्ठलराव थिपे, गटनेते विक्रम येरणे, पापया पोन्नमवार, हंसराज चौधरी, प्रा. आशिष देरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting