Home रायगड कर्जत नगरपरिषदेतर्फे कोरोना निर्जुंतीकरण कक्षाचे उद्घाटन

कर्जत नगरपरिषदेतर्फे कोरोना निर्जुंतीकरण कक्षाचे उद्घाटन

70
0

कर्जत – जयेश जाधव

कर्जत नगरपरिषदेतर्फे आज बाजारपेठेत जुन्या नगरपरिषदेजवळ कोरोना निर्जुंतीकरण कक्षाचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णाताई जोशी, मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील, नगरसेविका संचिता पाटील, नगरसेवक संकेत भासे, आरोग्य विभागाचे कर्मचारी सुदाम म्हसे, निलेश चौडीये आदी उपस्थित होते.

कर्जत रेल्वे स्थानक परिसरातून अत्यावश्यक कामासाठी येणारे जाणारे नागरिक यांना कोरोना आजारांचा विषाणू पासून सुरक्षेसंदर्भात मदत मिळावी,निर्जुंतकरण व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.त्याचबरोबर कपालेश्वर मंदिराशेजारी सॅनिटाझरेशन साठीही प्रशासनाने व्यवस्था करून कोरोनाच्या या लढाईत एक पाऊल पुढे टाकले आहे.यावेळी रस्त्या- रस्त्यावर कोरोना आजारां संदर्भात मेसेज, सुविचार रेखाटण्याचे कामही प्रशासनाने हाती घेतले आहे.