जळगावमहत्वाची बातमी

पाल वृन्दावन धाम आश्रमतर्फे गरीब गरजू आदिवासियाना शिधावाटप

रावेर (शरीफ शेख)

तालुक्यातील पाल वृन्दावन धाम आश्रमतर्फे गरीब गरजू आदिवासियाना कोरोना या महामारी मुळे माननीय प्रधानमंत्री यांच्या आदेशानुसार देशभरात लॉगडॉउन असल्यामुळे गेल्या दहा बारा दिवसांपासून मजूर बेरोजगारिच्या सावटाखाली वावरत असल्यामुळे अश्या बिकट परिस्थितीत येथील परिसरातील गोर गरीब गरजू आदिवासी बाँधवाना जीवनावश्यक वस्तुची गरज भासत असल्यामुळे काहीतरी खारिचा वाटा या लोकांच्या सेवेकारिता अर्पण करणे गरजेचे असल्यामुळे या सेवेकरिता अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराकडून परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी स्थापित श्री वृन्दावन धाम पाल आश्रमाचे विद्यमान गादिपति श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सानिध्यात या गरजू लोकांना शिधा वाटप करण्यात आले.
बुडतसे जन, न पहावेसी डोळा , म्हनूनि कळवळा येत असे या संतांच्या उपदेशानुसार अश्या कोरोना सारख्या महामारी प्रसंगी विविध प्रकारच्या सेवा वेगवेगळ्या माध्यमद्वारे देशभरातील दानशूर लोकाकडून होताना दिसत आहे. असेच पाउल अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराकडून उचलण्यात आले असून पाल सह परिसरातील शेकडो आदिवासी , गोर ग़रीबाना श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज तसेच ब्रम्हचारी यांच्या सानिध्यात परम पूज्य सदगुरु श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम श्री वृन्दावन धाम पाल येथून पाच किलो गहुचे पीठ, तेल, भजिपाला, अश्या विविध प्रकारच्या जीवनावश्यक शिधा वाटप करण्यात आले.

वाहन चालकाना भोजन वाटप

सातपुडयाच्या पायथ्याशी वसलेल्या हे वृन्दावन धाम पाल आश्रम मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सिमेवर असल्याने कोरोना महामारिच्या लॉगडॉउन मुळे काही दिवसांपूर्वी या सिमेवर पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान, जम्मूकश्मीर कडिल वाहन अडविन्यात आले होते .तर अश्या परिस्थितीत शेकडो वाहन चालक , क्लीनर याच्यावर उपासमारिचे सावट पसरलेले दिसून येत होते . अश्या परिस्थितीत त्याची भूक भागविन्याकरिता पाल आश्रमा तर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती ही सर्व कामे सोशल डिस्टनसिंग चे भान ठेऊन करण्यात येत आहे. याच बरोबर दरवर्षी दिवाळी तसेच परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या समाधि दिनानिमित्त सुद्धा चैतन्य साधक परिवारातर्फे पाल आश्रमाच्या सानिध्यात परिसरातील गोर, गरीब, गरजू तसेच आदिवासी बाँधवाना फराळ व कपड़े वाटप करण्यात येतात. सत्संग , सस्करासोबत अश्या विविध गतिविधि व सत्कमाची कार्य केली जातात. तसेच कोरोना सारख्या महामारिच्या निवारनाकरिता अनुस्टान व प्रार्थना चैतन्य साधक परिवारातर्फे आपापल्या घरात राहून करण्यात येत आहे.

You may also like

जळगाव

त्या ८शेतकऱ्यांसाठी आले जळगावकर धावून- दिवसभर बाफना गोशाळा, एमआयडीसी पोलीस स्टेशन व कोर्ट असे शेतकऱ्यांच्या नशिबी चकरा

  जलगाँव:(एजाज़ गुलाब शाह) पाचवे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती कुलकर्णी यांनी दिलेल्या आदेशानुसार त्या आठ ...
महत्वाची बातमी

मक्का शरीफ मे आज जोरदार बारीश हुई हो रही इस बारीश का बहेतरिन विडिओ हमे मक्का शरीफ से प्राप्त हुवा है 

पवित्र मक्का शरीफ मे आज जोरदार बारीश हुई हो रही इस बारीश का बहेतरिन विडिओ ...
जळगाव

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी केली जम्बो कार्यकारिणी जाहीर… आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप…

अमळनेर  –  येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी आमदार अनिल ...