Home मराठवाडा स्वा.रा.तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ऑनलाइन (edmodo) ऍप्सद्वारे वर्ग सुरू

स्वा.रा.तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ऑनलाइन (edmodo) ऍप्सद्वारे वर्ग सुरू

64
0

नांदेड , दि. ०७ ( राजेश भांगे ) सर्व जग आता तंत्रज्ञानाचा वापर करून, सर्व काम सोपं करू पाहत आहे. सर्वांना कमी वेळात काम करणे या तंत्रज्ञानामुळे शक्य बनत आहे. त्यात कोरोना सारख्या संसर्गजन्य विषाणूने जगभरात थैमान घातले असताना, याला आळा घालण्यासाठी सोशल डिस्टन्स हा त्यावर रामबाण उपाय ठरत असल्याने, नांदेडच्या स्वारातीम विद्यापीठाने अशाच तंत्रज्ञान वापरत करत इडमोडो(edmodo) या ऍप्सद्वारे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरू केले.

अख्या जगाला कोरोना (कोविड-१९) विषाणूने हादरून सोडले. चीन, इटली, फ्रांस, अमेरिका सारख्या बलाढ्य देशाने या विषाणूपुढे घुडघे टेकले. भारतातही ही मागच्या दोन महिन्यांपासून या विषाणूचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होत. यावर वेळीच राज्य सरकार, केंद्र सरकार यांनी आवश्यकत्या उपाय योजना करण्यास सुरुवात केली. त्यामुळे इतर देशापेक्षा आपल्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव तेवढ्याप्रमाणात नाही. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे होणारी गर्दी टाळून, होणार एकमेकांचा संपर्क कमी करून या विषाणूमुळे पसरणाऱ्या संसर्गाला आळा घालण्यासाठी हा लॉकडाऊन लागू केला.
या लॉकडाऊनला अनेकांकडून प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. यालाच प्रतिसाद देत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानेही या लॉकडाऊनच्या काळात आपल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन वर्ग सुरू करण्याची संकल्पना राबली. यात इडमोडो या ऍप्स द्वारे विद्यार्थ्यांना विषय निहाय व वर्ग निहाय ग्रुप करून त्यांना संबंधित विषयाचे शिक्षक ऑनलाइन मार्गदर्शन करतात. त्यावर विद्यार्थीही आपल्या समस्या या ऍप्सद्वारे आपल्या विषयाच्या शिक्षकास विचारू शकतात. विद्यापीठाच्या अनेक शिक्षण संकुलात या ऍप्सद्वारे ऑनलाइन अध्यापन केले जात आहे. ज्याला विद्यार्थीही चांगला प्रतिसाद देत ऑनलाइन अध्ययन करत आहेत. त्यापैकी शिक्षणशास्त्र संकुलात या ऍप्सद्वारे विद्यार्थ्यांना नोट्स, प्रात्यक्षिके, लघु शोध प्रबंध लिखाणाचे मार्गदर्शन अशा सर्व प्रकारचे दैनंदिन शैक्षणिक कामकाज चालते. त्यामुळे विद्यापीठात लॉकडाऊन संपेपर्यंत विद्यार्थ्यांना येण्याची गरजही नाही आणि अध्यापन कार्यही सुरळीत चालू आहे. या ऑनलाइन प्रक्रियेमूळे विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यामुळे वर्गात होणारी गर्दी कमी होईल आणि यामुळे सोशल डिस्टन्सही राखला जाईल. शिक्षणशास्त्र संकुलात ही ऑनलाइन प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संकुलाचे संचालक प्रा.डॉ. चंद्रकांत बाविस्कर, प्रा.डॉ. व्ही.एन.पाटील, प्रा.डॉ. एस.वाय. पाटील, प्रा.डॉ. अशोक गिणगीने, प्रा.डॉ. महेश जोशी, प्रा.महेश नळगे हे परिश्रम घेत आहेत. विद्यापीठाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून मोठे कौतुक होत आहे.