Home मराठवाडा कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्यामुळे सर्व सण उत्सव घरीच साजरे करा...

कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्यामुळे सर्व सण उत्सव घरीच साजरे करा , ?

40
0

बदनापूर येथील मान्यवरांच्या प्रतिक्रिया ,

सय्यद नजाकत

बदनापूर, (प्रतिनिधी)
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झालेले असून जालना शहरातही एक रूग्ण आढळल्यानंतर सामाजिक बांधिलकी म्हणून दिनांक 7 ते 14 एप्रिल दरम्यान येणारे सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आपआपल्या घरी साजरे करण्याचे आवाहन बदनापूर येथील सर्व सामाजिक स्तरातून करण्यात येत आहे.
सध्या संपूर्ण जगभरात कोरोना रोगाने थैमान घातलेले असून त्या पार्श्वभूमीवर भारतातही 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन व संचारबंदीचे आदेश देण्यात आलेले आहे. या संचारबंदी काळात कोणत्याही धार्मिक व सामाजिक उत्सवास परवानगी देण्यात येत नाही. 7 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान चार धार्मिक उत्सवह आहेत. 8 एप्रिल रोजी हनुमान जयंती व शब्ब-ए- बारात, 10 एप्रिल रोजी गुड फ्रायडे तर 14 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असे उत्सव या दरम्यान हेात आहे.
दरवर्षी हे उत्सव मोठया हर्षोउत्साहात साजरे होत असतात यंदा मात्र कोरोना रोगामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे व या रोगाचा संसर्ग एकमेकांच्या संपर्कामुळे वाढत असल्यामुळे सर्व सामाजिक नेत्यांनी हे सर्व धार्मिक व सामाजिक उत्सव आपआपल्या घरात व कुटुंबियासोबत साजरे करावे असे आवाहन केलेले आहे जेणेकरून गेल्या तेरा दिवसापासून घेत असलेले परिश्रम वाया जाऊ नये या उद्देशाने बदनापूर तालुक्यातील धर्मगुरू व सामाजिक कार्यकर्ते व अधिकाऱ्यांनी सदर सण घरात साजरे करून कोरोनाला पराजित करावे असे आव्हान केले आहे
——————-
हाजी सय्यद चांद-अमीर जमा मस्जिद बदनापूर
सध्या कोरोना रोगामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे शासनाने गर्दी न जमविण्याचा सूचना दिलेल्या असल्याने ८ एप्रिल रोजी होणारी शब्ब-ए- बारात मुस्लिम बांधवानी घरातच साजरी करावी ,घरात नमाज अदा करून कुराण वाचन व प्रार्थना करावी ,कोणी हि मस्जिद मध्ये येऊन गर्दी करू नये
————————————
सांडुजी कांबळे -दलित मित्र
दरवर्षी बदनापूर सह तालुक्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या थाटात साजरी केली जाते परंतु सध्याची परिस्थिती तशी नाही कोरोना रोगाशी आम्ही सर्वजण लढा देत असून लॉक डाऊन मध्ये तेरा दिवसापासून आपण सर्व घरातच थांबत आहे त्याच प्रमाणे १४ एप्रिल पर्यंत लॉक डाऊन असून आतापर्यंतचे प्रयत्न वाया जाऊ नये म्हणून डॉ.आंबेडकर जयंती सर्व बांधवानी घरातच साजरी करून शासनास सहकार्य करावे
—————————–
संतोष पवार-सामाजिक कार्यकर्ते
लॉक डाऊन मध्ये नागरिकांना एकत्र येण्यावर बंदी आहे विशेष म्हणजे शासन हे सर्व आपल्यासाठी करीत असल्याने नागरिकांनी यंदा हनुमान जयंती घरातच साजरी करून कोरोना रोगापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करावी व प्रशासनास सहकार्य करावे जेणेकरून कोरोनाचा लढा यशस्वी होईल
——————————-
एम.बी.खेडकर -पोलीस निरीक्षक बदनापूर
कोरोना रोगामुळे जिल्हादंडाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या आदेशाने जमावबंदी आदेश लागू केलेला असून ८ ते १५ दरम्यान विविध धार्मिक सण आलेले असल्याने आणि शासनाने सदर सण घरातच साजरे करण्याचे निर्देश दिलेले आहे जेणेकरून आपला कोरोना लढा यशस्वी होण्याच्या दृष्टीने मदत होईल तरी बदनापूर शहरासह तालुक्यातील नागरिकांनी उपरोक्त कालावधी मध्ये येणारे सॅन घरातच साजरे करून सहकार्य करावे

Unlimited Reseller Hosting