Home महत्वाची बातमी अन , तिच्या अर्थीला मुस्लिम बांधवांनी दिला शेवटचा कांद्या , ????

अन , तिच्या अर्थीला मुस्लिम बांधवांनी दिला शेवटचा कांद्या , ????

756

अमीन शाह

पालघर ,

कोरोनाच्या संकटातही माणुसकीचा धर्म श्रेष्ठ असल्याचं पालघरमधील मुस्लीम युवकांनी दाखवून दिलं आहे. पालघर येथील मनोर दुर्वेस वृद्धाश्रमात अखेरचा श्वास घेतलेल्या साठ वर्षीय वृद्धेसाठी मनोरच्या मुस्लीम बांधवांनी एकत्र येत तिच्यावर रितीप्रमाणे अंत्यसंस्कार केल्याने मानवतेचे दर्शन घडले आहे. लॉकडाऊन दरम्यान या वृद्ध महिलेचे अंत्यसंस्कार करणे अवघड असल्याने या मुस्लीम समाजाच्या बांधवांनी एकत्र येत अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडली.
लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्कारासाठी मृतदेह मुंबईला घेऊन जाणे शक्‍य नसल्याने मनोरमधील मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेऊन मुलाच्या उपस्थितीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आहेत. वृद्धाश्रमातील संध्या बिनसाळे ( 89) या वृद्ध महिलेला उपचारासाठी मनोर येथील आस्था हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सायंकाळी दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर तिचा मुलगा प्रकाश बिनसाळे हा मुंबईहून मनोरला पोहोचला, परंतु लॉकडाऊनमुळे मृतदेह मुंबईला नेणे शक्‍य नसल्याने मनोरलाच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या वेळी मनोरचे सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्वपरिचित असलेले रुग्णवाहिका चालक बिलाल रईस, बिलाल खतीब, फुरकान खतीब, रयान दळवी, फरहान दळवी आणि युसूफ मेमन आदींच्या मदतीने मनोर येथील हात नदीवरील स्मशानभूमीत हिंदू रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले.

देश कठीण परिस्थितीतून जात असताना मनोरच्या मुस्लीम बांधवांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. आवश्‍यक त्या परवानग्या घेऊन त्यानंतर अंत्यसंस्कार केले गेले.