Home मराठवाडा पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास मदतीसाठी दानवीर नांदेडकरांनी दिला भरभरून प्रतिसाद

पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास मदतीसाठी दानवीर नांदेडकरांनी दिला भरभरून प्रतिसाद

186
0

नांदेड , दि. ६ ( राजेश भांगे ) – देणाऱ्याचे हात हजार या वाक्याला सार्थ ठरवले ते नांदेडचे प्रसिध्द उद्योजक प्रदीप चाडावार याच्या मदतीने, गरजू ,बेघर, रेशनकार्ड नसणाऱ्या कुटुंबाना १ हजार अन्नधान्य मदत किट पालकमंत्री अशोक चव्हाण याच्यासह जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले.
कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी बेघर गरजू ,गोरगरीब जनतेला मदत म्हणून दहा किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो तेल, एक किलो मीठ, अर्धा किलो मिरची मसालापावडर असे १ हजार किट जिल्हा प्रशासनास १ हजार व्यक्तीला किट वाटप करण्यासाठी नांदेडचे प्रसिद्ध उद्योजक आणि व्यावसायिक प्रदीप चाडावार यांनी आज जिल्हा प्रशासनाकडे मदतीचे किट सुपूर्त केल्या. यावेळी आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ .विपीन इटनकर उपस्थित होते.

प्रदीप चाडावर हे मूळचे किनवटचे असून नांदेड येथे वास्तव्यास आहेत. लायन्स क्लब नांदेडचे ते सदस्य असून सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचे योगदान राहिले आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या आवाहनास प्रतिसाद देत त्यांनी एक हजार किट जिल्हा प्रशासनास वाटपासाठी सुपूर्द केल्या. ज्या कुटुंबाकडे रेशनकार्ड नाही अशा गरजुना याचे वाटप करण्यात येणार आहेत. देणाऱ्याचे हात हजार, तसे हजार व्यक्तीला ही मदत पोहोचणार म्हणून हे वाक्य आज सार्थ ठरले आहे. नांदेडकरांनी नांदेडकरसाठी केलेली मदत आणि प्रशासन व पालकमंत्री यांच्या समनव्यातुन कोरोनाच्या संकटा मधून लवकरच बाहेर पडतील असा विश्वास वाटतो.

Previous articleफुले जयंतीला ज्ञानाचा तर बाबासाहेबांच्या जयंतीला संविधानाचा दिवा लावा – शरद पवार
Next articleशब ए बरात घरातच साजरी करण्याचे आवाहन
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here