Home मुंबई फुले जयंतीला ज्ञानाचा तर बाबासाहेबांच्या जयंतीला संविधानाचा दिवा लावा – शरद पवार

फुले जयंतीला ज्ञानाचा तर बाबासाहेबांच्या जयंतीला संविधानाचा दिवा लावा – शरद पवार

124
0

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी ११ एप्रिलला साजऱ्या होणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीला ज्ञानाचा दीवा तर १४ एप्रिलला साजऱ्या होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला संविधानाचा दीप लावून ही जयंती साजरी करा, असं आवाहन त्यांनी केलं.
यावर्षी महावीर जयंती, शब्बे-बारात घरातच करा, मुस्लीम बांधवांनी घरातच पूर्वजांचे स्मरण करा, महात्मा फुले जयंतीला ज्ञानदीप लावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संविधानाचा दीप लावून साजरी करुया, गर्दी टाळूया, अंतर राखूया, असं ते म्हणाले.
माणसाने अंद्धश्रद्धा पाळू नयेत. सतत चिकित्सक असावं. वैज्ञानिक दृष्टीकोन पाळावा. विवेक सतत जागृत ठेवावा. कारण महाारष्ट्राला पुरोगामी विचारांची शिकवण आहे, असं ते म्हणाले.
दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, डॉक्टर, नर्स कष्टाने काळजी घेत आहेत, घरी बसायला पाहिजे, सर्व जात-धर्मानी एकत्र राहण्याची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

Previous articleपोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांच्या पुढाकाराने अंदोरी त झाला अनोखा विवाह सोहळा.!
Next articleपालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास मदतीसाठी दानवीर नांदेडकरांनी दिला भरभरून प्रतिसाद
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here